शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वस्त क्रुड ऑईल खरेदी करून कमावला नफा, आता सरकारी कंपन्या का कमी करत नाहीयेत इंधनाचे दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 10:19 AM

1 / 8
Petrol-Diesel Price: देशात पेट्रोल डिझेलचे दर आजही स्थिरच आहे. इंधन कंपन्यांनी आजही पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारनं पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
2 / 8
आज सलग ४२१ वा दिवस आहे जेव्हा पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. गेल्या काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीनंतर इंधन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नफा कमावला होता. यानंतरही देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणतीही कपात करण्यात आलेली नव्हती.
3 / 8
किरकोळ विक्रेते किमतीत कपात करण्यास विलंब करत आहेत. दरम्यान, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर्सपर्यंत वाढल्या आहेत. OPEC+ देशांच्या उत्पादनात घट आणि डॉलर कमकुवत झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात तेलाच्या किमतींनी सलग तिसरी साप्ताहिक वाढ नोंदवली होती.
4 / 8
एप्रिलनंतर पहिल्यांदा जागतिक बेंचमार्क ब्रेंट गेल्या शुक्रवारी ८१ डॉलर्स प्रति बॅरलच्या वर होता. बाजाराला आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी आणि ओपेककडून पाठिंबा मिळाला आहे, ज्यांनी दुसऱ्या सहामाहीत मागणीत सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवला आहे. इजिप्त आणि नायजेरियातील पुरवठा थांबल्यामुळे, अमेरिकेतील व्याज दरातील वाढीवर रोख लागण्याच्या शक्यतेनं यात वाढ झाली आहे.
5 / 8
तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या दरावर पुन्हा एकदा विंडफॉल टॅक्स लावण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे. यापूर्वी मे महिन्यात विंडफॉल टॅक्स शून्य करण्यात आला होता, कारण कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत कमी झाले होते. रिफाइंड उत्पादनांवर निर्यात कर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण इंधनाच्या वाढत्या किंमती रिफायनिंग मार्जिन वाढवतात.
6 / 8
बाजारातील अस्थिरतेनं स्टेट ऑपरेटेड फ्युअल रिटेलर्ससाठी चिंता निर्माण केली आहे. इंधनाच्या किंमतींमधील घसरणीनं मे २०२२ पासू स्थिर दरांवर पेट्रोल आणि डिझेल लाभदायक बनवलं. आता त्यांनी किंमतीत कपात केली आणि वर्षाच्या अखेरिस कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली तरी राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे पुन्हा इंधनाचे दर वाढवणं शक्य होणार नाही.
7 / 8
सरकारी किरकोळ विक्रेते यापूर्वीचा तोटा भरुन काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करत नाहीयेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. निवडणुकांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील कपात सरकारसाठी चांगली ठरू शकते. परंतु हे कच्च्या तेलाच्या बाजारातील स्थिरतेवर अवलंबून असेल असं तज्ज्ञ म्हणाले.
8 / 8
गेल्या वर्षी २२ मेपासून पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. केंद्रानं यापूर्वी त्याच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. यामध्ये एकूण १३ रुपये आणि १६ रुपयांची कपात झाली होती.
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलCrude Oilखनिज तेल