शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:06 IST

1 / 8
जर तुम्ही तुमच्या कमाईतील एक हिस्सा वाचवून अशा ठिकाणी गुंतवू इच्छित असाल जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि परतावाही जोरदार मिळेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बाबतीत पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या बचत योजना अत्यंत लोकप्रिय असून त्या मोठा परतावा देतात.
2 / 8
विशेषतः पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) अशा गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. जे कमी जोखीम असलेल्या टॅक्स फ्री गुंतवणुकीचा विचार करतात त्यांच्यासाठी ही स्कीम उत्तम आहे. सरकारकडून या गुंतवणुकीवर ७ टक्क्यांहून अधिक व्याज दिलं जातं.
3 / 8
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणुकीवर सरकारकडून वार्षिक ७.१% टॅक्स फ्री व्याज ऑफर केले जाते, जे या योजनेच्या लोकप्रियतेत महत्त्वाची भूमिका बजावते. विशेष म्हणजे, ही सरकारी योजना उच्च टॅक्स ब्रॅकेटमध्ये येणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीही फायदेशीर आहे.
4 / 8
पीपीएफ गुंतवणुकीत ८०सी अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळतो आणि ही योजना EEE श्रेणीत येते. याचा अर्थ असा की, योजनेत तुम्ही केलेले योगदान करमुक्त आहे, त्यावर मिळणारं व्याज करमुक्त आहे आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम देखील पूर्णपणे करमुक्त असेल.
5 / 8
पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेचा लॉक-इन-पीरियड १५ वर्षांचा आहे. यामध्ये किमान ५०० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करता येते. एका आर्थिक वर्षात पीपीएफ योजनेत जास्तीत जास्त १.५० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, १५ वर्षांचा लॉक-इन-पीरियड संपल्यानंतरही जर तुम्हाला तुमची गुंतवणूक सुरू ठेवायची असेल, तर तुम्ही ती पुढील पाच वर्षांसाठी वाढवू शकता.
6 / 8
१५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीत तुम्ही या सरकारी योजनेद्वारे ४० लाख रुपयांपेक्षा जास्त निधी कसा जमा करू शकता, याचे गणित अत्यंत सोपं आहे. जर तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षात १.५ लाख रुपयांची कमाल मर्यादेपर्यंत गुंतवणूक केली, तर तुम्हाला तुमच्या मासिक उत्पन्नातून दरमहा १२,५०० रुपये वाचवावे लागतील.
7 / 8
१५ वर्षांपर्यंत ही रक्कम नियमितपणे पीपीएफ खात्यात जमा केल्यास, ७.१ टक्के व्याजदरानुसार तुमची एकूण जमा रक्कम २२,५०,००० रुपये होईल. या रकमेवर तुम्हाला १८,१८,२०९ रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीनंतर तुमच्या हातात येणारी एकूण रक्कम ४०,६८,२०९ रुपये असेल.
8 / 8
पीपीएफ खातं कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत उघडता येतं. या गुंतवणुकीवर कर्जाची सुविधा देखील दिली जाते; सुरुवातीच्या गुंतवणुकीचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर कर्जासाठी अर्ज करता येतो. पीपीएफच्या इतर फायद्यांबद्दल सांगायचं तर, खातं उघडल्यापासून ५ वर्षांनंतर यातून पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा