Post office MIS: लग्नानंतर लगेचच पोस्टात हे अकाऊंट उघडा; दर महिन्याला येतील 4950 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 19:56 IST
1 / 9माणसाच्या आयुष्यात लग्नानंतर मोठी जबाबदारी येते. तोवर तो आपल्या मनाचा मालक असतो. आधी आई वडील असतातच परंतू नंतर दोनाचे चार हात होतात आणि हळूहळू कुटुंब वाढू लागते. बायको, मुलांची जबाबदारी असते. त्यांच्या शिक्षणाची, पालनपोषणाची जबाबदारी येते. अशावेळी कर्त्या पुरुषालाच काही झाले तर... 2 / 9वाईट विचार परंतू तो आधी केलेला बरा असतो नाही का. समजा नोकरी गेली, अपघातात अपंगत्व आले तर पुढे काय? हे आपले भविष्य सुखकर होण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या काही योजना आहेत, तिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात, तसेच गॅरंटीड रिटर्नदेखील मिळतो. 3 / 9पोस्ट ऑफिसची एक सुपरहिट स्मॉल स्कीम आहे त्यात तुम्हाला एकदा पैसे गुंतवावे लागतात आणि पाच वर्षांनी तुम्हाला खात्रीशीर मासिक उत्पन्न मिळू लागते. चला जाणून घेऊया या स्कीमबद्दल. 4 / 9या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली योजना. POMIS स्कीममध्ये सिंगल आणि जॉईंट अशा दोन्ही प्रकारचे खाते उघडता येते. कमीतकमी 1,000 रुपयांची गुंतवणूक करून खाते उघडता येईल. एकाचेच अकाऊंट असले तर जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये आणि दोघांमध्ये असले तर ९ लाख रुपये गुंतवू शकता. 5 / 9MIS मध्ये दोन किंवा तीन लोक मिळून जॉईंट अकाऊंट उघडू शकता. या अकाऊंटमधून जेवढा फायदा होईल तेवढा तो दोघांमध्ये विभागला जातो. हे अकाऊंट कधीही सिंगल करू शकता. तसेच सिंगल अकाऊंटला कधीही जॉईंट अकाऊंटमध्ये बदलू शकता. यासाठी सह खातेदारासोबत अर्ज द्यावा लागतो. 6 / 9इंडिया पोस्टनुसार या मंथली इन्कम स्कीममधून वर्षाला ६.६ टक्के व्य़ाज मिळते. ते दर महिन्याला दिले जाते. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये भारतीय नागरिकच गुंतवणूक करू शकतात. 7 / 9MIS ची मुदत ही पाच वर्षांची असते. यामध्ये मुदतपूर्व बंदही करण्याची सोय आहे. मात्र, एक वर्ष पूर्ण झाल्यावरच तुम्ही रक्कम काढू शकता. नियमांनुसार जर तुम्ही एक वर्ष ते तीन वर्षाच्या आत पैसे काढले तर डिपॉझिट अमाऊंटच्या २ टक्के रक्कम कापली जाते. जर तीन ते पाच वर्षांत काढलीतर १ टक्के रक्कम कापली जाते. 8 / 9MIS अकाऊंटला एका पोस्ट कार्यालयातून दुसऱ्या पोस्ट कार्यालयात वळते केले जाऊ शकते. पाच वर्षे पूर्ण झाली की पुन्हा पाच-पाच वर्षांसाठी मुदत वाढविता येते. या अकाऊंटला नॉमिनेशनची सुविधादेखील आहे. सरकारच्या सॉवरेन फंडची सुरक्षा मिळते.9 / 9MIS अकाउंट साठी पोस्टात सेव्हिंग अकाऊंट असणे गरजेचे आहे. आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा व्होटर आयडी असावे. दोन पासपोर्ट साईज फोटो लागतात. यानंतर ऑनलाईन डाऊनलोड किंवा पोस्टात जाऊन योजनेचा फॉर्म घ्यावा. सुरुवातीला तुम्हाला १००० रुपये भरावे लागतील.