शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३१ मार्च २०२५... पोस्ट ऑफिसची ही योजना बंद होणार; FD पेक्षाही जास्त व्याज देत होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 10:10 IST

1 / 8
महिलांसाठी असलेली पोस्टाच्या एका योजनेचा कालावधी लवकरच संपणार आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी खूप कमी काळ शिल्लक राहिला आहे.
2 / 8
महत्वाचे म्हणजे ही योजना महिलांसाठी असून सरकारने या योजनेचा कालावधी वाढविलेला नाही. यामुळे ज्या महिलांनी या योजनेत पैसे गुंतविलेले नाहीत त्यांच्याकडे केवळ १५ दिवस बाकी आहेत.
3 / 8
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) असे या योजनेचे नाव आहे. पोस्ट ऑफिस अंतर्गत ही योजना चालविली जाते. महिलांसाठी या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. १ एप्रिलपासून ही योजना बंद होऊ शकते.
4 / 8
महिला आणि मुलींसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरु करण्यात आली होती. भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ३१ मार्च २०२३ रोजी ही योजना सुरु केली होती. दोन वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात आली.
5 / 8
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणे हा या योजनेचा उद्देश होता. या योजनेत २ वर्षांची मॅच्युरिटी देण्यात आली होती. या काळासाठी ७.५० टक्के व्याज दिले जात होते.
6 / 8
महत्वाचे म्हणजे हे व्याज अन्य बँकांच्या २ वर्षांच्या एफडीपेक्षाही जास्त होते. तसेच सुरक्षितही होते. कारण ही योजना सरकार चालवत होते.
7 / 8
भारतातील महिला १००० रुपयांपासून ते अधिकाधिक २ लाख रुपयांपर्यंत या योजनेत गुंतवू शकत आहेत. २ वर्षांचा कालावधी संपला की या महिलांना मुद्दल आणि व्याज दिले जात होते. तसेच पैसे गुंतविल्यानंतर १ वर्ष झाले की महिला त्याताली ४० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकत होती.
8 / 8
गंभीर आजार किंवा खातेधारकाचा मृत्यू यासारख्या परिस्थितीत खाते अकाली बंद केले जाऊ शकते. ६ महिन्यांनंतर खाते बंद केले तर व्याजदर कमी केला जाऊ शकतो.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसWomenमहिला