मुलांच्या भविष्याचं प्लानिंग करताय? 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक करा; १८ व्या वर्षी होऊ शकतात कोट्यधीश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 14:08 IST
1 / 7प्रत्येकाला आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं असंच वाटत असतं. पण त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणं खूप गरजेचं आहे कारण उच्च शिक्षणापासून लग्नापर्यंत सगळीकडे तुम्हाला भरपूर पैशांची गरज भासते. हे नियोजन जितक्या लवकर कराल तेवढ्या मोठ्या रकमेची भर पडेल. जर तुम्ही अद्याप हे करू शकला नसाल तर येथे अशी पद्धत आहे जी आपल्या मुलाला लहान वयातच कोट्यधीश बनवू शकते. समजून घेऊ कसं?2 / 7मुलांना कोट्यधीश बनवण्यासाठी १८x१५x१२ या फॉर्म्युलाचा वापर करा. या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही मुलांच्या जन्मापासूनच या फॉर्म्युल्यासह गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुमचं मूल वयाच्या १८ व्या वर्षी कोट्यधीश बनू शकते.3 / 7सूत्रानुसार १८ म्हणजे १८ वर्षे म्हणजेच मुलांच्या जन्मापासून एसआयपी सुरू करावी लागते आणि मूल १८ वर्षांचे होईपर्यंत चालू ठेवावी लागते. १५ म्हणजे १५,००० रुपयांची एसआयपी आणि १२ म्हणजे परतावा. एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो.4 / 7जर तुम्ही हा फॉर्म्युला लागू केला आणि मुलाच्या नावानं १५,००० रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली आणि सलग १८ वर्षे चालू ठेवली तर तुम्ही १८ वर्षात एकूण ३२,४०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्के मोजला तर १८ वर्षांत तुम्हाला या रकमेवर ८२,४१,५८९ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे १८ वर्षांनंतर गुंतवलेली एकूण रक्कम आणि व्याज १,१४,८१,५८९ रुपये होईल. अशा प्रकारे तुमचं मूल १८ वर्षांचं झाल्यावर ते १,१४,८१,५८९ रुपयांचे मालक असेल. अशावेळी तुम्ही या रकमेतून त्याच्या सर्व गरजा सहज भागवू शकता.5 / 7एसआयपीमध्ये कंपाउंडिंगचा जबरदस्त फायदा मिळतो. एसआयपी जितकी मोठी असेल तितका कंपाउंडिंगचा फायदा जास्त होतो. त्याचा सरासरी परतावा १२ टक्के आहे, जो इतर कोणत्याही योजनेत उपलब्ध नाही. अनेकवेळा परतावा यापेक्षा जास्त असतो. याशिवाय यात तुम्हाला रुपयाच्या किमतीचा फायदा मिळतो. यामुळे बाजारातील चढ-उताराच्या परिस्थितीतही तुमचा खर्च सरासरी राहतो.6 / 7त्याचबरोबर गुंतवणुकीचा कालावधी आणि रकमेबाबत एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची लवचिकता आहे. आपण आपल्या सोयीनुसार मासिक, तिमाही किंवा सहामाही गुंतवणूक कालावधीचा पर्याय निवडू शकता. जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण ती थांबवू शकता आणि आपल्या एसआयपीमधून पैसे काढू शकता आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा एसआयपीमध्ये आपली गुंतवणूक वाढवू शकता.7 / 7(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)