शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल पाठोपाठ मुंबईत डिझेलचंही शतक; पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 8:28 AM

1 / 7
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे चिताग्रस्त झालेल्या सामान्यांना शनिवारी आणखी एक झटका लागला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) सलग पाचव्या दिवशी वाढ झाली. यानंतर मुंबईत डिझेलचे दर १०० रूपयांच्या पुढे गेले आहेत.
2 / 7
शनिवारी दिल्लीत डिझेलच्या दरात ३५ पैशांची, तर पेट्रोलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) नुसार दिल्लीत पेट्रोलचे दर १०३.५४ रूपयांवरून वाढून १०३.८४ रूपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.
3 / 7
तर दुसरीकडे डिझेलच्या दरात ३५ पैशांची वाढ होऊन ते ९२.१२ रूपयांवरून वाढून ९२.४७ रूपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारात इंधनाच्या दरानं उच्चांक गाठल्याचं म्हटलं जात आहे.
4 / 7
चार प्रमुख शहरांबद्दल सांगायचं झआल्यास मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सर्वाधिक आहेत. मुंबईत डिझेलचे दर १०० रूपयांच्या पार देले आहेत, तर पेट्रोलदेखील ११० रूपयांच्या नजीक आलं आहे. नव्या दरानुसार मुंबईत पेट्रोल १०९.८३ रूपये प्रति लीटर आणि डिझेल १००.२९ रूपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे.
5 / 7
तर दुसरीकडे कोलकात्यात पेट्रोलचे दर १०४.५२ रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ९५.५८ रूपये प्रति लीटर आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर १०१.२७ रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ९६.९३ रूपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.
6 / 7
आजच्या दरांसहित गेल्या पाच दिवसांमध्ये दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रति लीटर दीड रूपयांची वाढ झाली आहे. तर या महिन्यात पहिल्या ९ दिवसांमध्ये पेट्रोल दीड रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
7 / 7
तुम्हाला एसएमएसद्वारेही पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेता येऊ शकतात. यासाठी इंडियन ऑईल एसएमएस सेवेद्वारे 9224992249 वर एसएमएस पाठवू शकता. यासाठी तुम्हाला RSP (स्पेस) पेट्रोलपंप डिलर कोड टाकावा लागेल. RSP तुम्हाला साईटवर जाऊन पाहावा लागेल. हा मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला नव्या दरांची माहिती मिळेल.
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलIndiaभारत