सर्वसामान्यांना मिळणार दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 17:27 IST
1 / 8नवी दिल्लीः देशांतर्गत तेल कंपन्यांनी सलग 24 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) कोणताही बदल केलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नसला तरी पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सर्वसामान्यांवर परिणाम झाला आहे. 2 / 8मात्र, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या दीड आठवड्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 7 टक्क्यांनी खाली आली आहे. एक्सपर्ट्सच्या मते, कच्च्या तेलाच्या घसरणीचा फायदा सामान्य जनतेला मिळू शकतो.3 / 8IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गुप्ता यांनी सांगितले की, कोरोना संकट काळात तेलाची मागणी कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती खाली आल्या आहेत.4 / 8मागणीअभावी कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. तसेच एक ते दीड आठवड्यात किमतीत 7 टक्के घसरण नोंदवली गेली आहे. मागणी कमकुवत झाल्यास किमती आणखी खाली येऊ शकतात. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. 5 / 8देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 91.17 रुपये आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत प्रतिलिटर 81.47 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.57 रुपये झाली आहे.6 / 8अनुज गुप्ता म्हणाले की, जर कच्च्या तेलाचे दर अशाच पद्धतीने घसरत राहिले तर सर्वसामान्यांना याचा फायदा मिळू शकेल. तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू शकतात.7 / 8घरगुती तेल कंपन्यांनी सलग 24 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही, परंतु सरकारने तेलातून मोठी कमाई केलीय. केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेलवरील कर संग्रह गेल्या सहा वर्षांत 300 टक्क्यांहून अधिक वाढला. 8 / 8चालू आर्थिक वर्ष 2020-21च्या पहिल्या दहा महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलवरील कर संकलन 2.94 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. वित्त राज्यमंत्री म्हणाले, 2014-15 या आर्थिक वर्षात पेट्रोल, डिझेल आणि गॅस महसूल संकलन 5.4 टक्के होते, जे चालू आर्थिक वर्षात 12.2 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.