शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१४७ रुपयांच्या शेअरनं केलं मालामाल; ८ महिन्यांत दिले ५ हजार टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 3:13 PM

1 / 7
शेअर बाजारातील गुंतवणूक ही अनिश्चित असते. त्यात कधी फायदा होतो, तर कधी नुकसानही सोसावं लागू शकतं. आज आपण अशा एका स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यानं यावर्षी २०२१ मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल ५१९२ टक्क्यांचं रिटर्न देत मालमाल केलं आहे.
2 / 7
या पेनी स्टॉकने (Penny Stock) गुंतवणूकदारांना एप्रिल २०२१ पासून आतापर्यंतचा सर्वाधिक रिटर्न देत आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा स्टॉक ईकेआय एनर्जी (EKI Energy) या कंपनीचा आहे. ही देशातील कार्बन क्रेडिट इंडस्ट्रीची लीडिंग कंपनी आहे.
3 / 7
ईकेआय एनर्जी या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली होती. त्यावेळी कंपनीचा शेअर १४७ रुपयांवर लिस्ट झाला होता. एप्रिलपासून स्टॉक ५,००० टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
4 / 7
या कंपनीच्या शेअरची मागणी इतकी अधिक आहे की जवळजवळ दररोज या स्टॉकला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागत आहे. जर एखाद्याने या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य आजपर्यंत ५० लाख रुपयांपेक्षा जास्त झालं आहे.
5 / 7
कंपनी क्लायमेट चेंज अॅडव्हायझरी, कार्बन क्रेडिट ट्रेडिंग, बिजनेस एक्सीलेंस अॅडव्हायझरी आणि इलेक्ट्रीकल सेफ्टी ऑडिट यामध्ये सेवा देत आहे. परंतु कंपनीचा प्रमुख व्यवसाय हा कार्बन क्रेडिटचा व्यापार करणं हे आहे.
6 / 7
भारताचा कार्बन बाजार हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि त्याने लाखो कार्बन क्रेडिट्स निर्माण केले आहेत. जेव्हा EKI Energy चा शेअर एप्रिल २०२१ मध्ये लिस्ट झाला होता, तेव्हा याचा मार्केट कॅप १८ कोटी रुपये होते. हे मार्केट कॅप आता ५०९३ कोटी रुपये झाले आहे.
7 / 7
ही कंपनी मार्च २०२१ पर्यंत पूर्णत: कर्जमुक्त कंपनी आहे. तर कंपनीमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा ७३.५ टक्के आहे. याशिवाय प्रमोटर्सनं आपला कोणताही शेअर तारणही ठेवलेला नाही.
टॅग्स :share marketशेअर बाजारMONEYपैसा