शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पेटीए, झोमॅटो, पॉलिसीबाझारसह ‘या’ शेअर्सचे ‘हाल बेहाल’, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 20:45 IST

1 / 7
गेल्या वर्षी नव्या युगातील तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये आयपीओ आणण्यासाठी स्पर्धा लागली होती. 2021 मध्ये, पेटीएम (Paytm) ते नायका (Nykaa) आणि झोमॅटो (Zomato) सारख्या दिग्गजांनी शेअर बाजारात एन्ट्री घेतली. यानं बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले.
2 / 7
मात्र, या कंपन्यांच्या शेअर्समधून पैसे गुंतवून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पेटीएम ते नायका आणि झोमॅटो ते कार ट्रेड आणि Policybazaar पर्यंतच्या आयपीओंनी गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटींचे नुकसान केले आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या एका अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
3 / 7
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात झोमॅटोचा शेअर 2.25 टक्क्यांच्या घसरणीसह 67.45 रुपयांवर बंद झाला. फूड अॅग्रीगेटरचं मार्केट कॅप 52,328.44 कोटी रूपये आहे. 23 जुलै 2021 रोजी लिस्टिंग दरम्यान, कंपनीचे मार्केट कॅप 98,731.59 कोटी रूपये होते..
4 / 7
तर दुसरीकडे कामाकाजाच्या अखेरच्या सत्रात पेटीएमचे शेअर 2.82 टक्क्यांच्या घसरणीसह 583.55 रुपयांवर बंद झाले. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 38146.17 कोटी रूपयांच्या जवळपास झाले. यापूर्वी कंपनीचं मार्केट कॅप 1,01,399.72 कोटी रुपये होते.
5 / 7
तर एफबी फिनटेक (Policybazaar) च्या लिस्टिंग दरम्यान कंपनीचं मार्केट कॅप 54,070.33 कोटी रूपये होते. परंतु आता ते 26,475.54 कोटी रूपये झाले आहे. तर कंपनीच्या शेअरची किंमतही घसरून 585 रुपयांवर पोहोचली आहे.
6 / 7
तर दुसरीकडे सोमवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात नायकाच्या शेअर्समध्ये 1.11 टक्क्यांची वाढ होऊन ते 1462 रुपयांवर पोहोचले. लिस्टिंग दरम्यान कंपनीचे मार्केट कॅप 1,04,360.85 कोटी रूपये होते. परंतु आता कंपनीचे मार्केट कॅप 69,471.04 कोटी रूपये झाले आहे.
7 / 7
सोमवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात कारट्रेडचे शेअर्स 8.51 टक्क्यांनी घसरून 638 रूपयांवर पोहोचले आहेत. लिस्टिंगदरम्यान कंपनीचं मार्केट कॅप 6,875.57 कोटी रूपये होते. परंतु आता कंपनीचे मार्केट कॅप 3,087.30 कोटींच्या जवळ आले आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारPaytmपे-टीएमZomatoझोमॅटो