दर महिन्याला दीड लाख रुपये कमाईची संधी; उद्योगासाठी मिळते सब्सिडी, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 03:35 PM2022-06-01T15:35:15+5:302022-06-01T15:40:30+5:30

कुठलाही उद्योगधंदा सुरू करण्यापूर्वी त्याचं मार्केट किती मोठं आहे? त्यात किती संधी आहे? याचा विचार करावा लागतो. बिझनेस सुरू करण्यापूर्वी रिसर्च केला तर त्यात होणाऱ्या नुकसानाची जोखीमही कमी असते.

आज जागतिक दुग्ध दिवस(World Milk Day) असून या बिझनेसबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. या धंद्यात कधी मंदी येत नाही. मंदीतही चांदी होते. डेअरी फार्मिंग बिझनेस करून तुम्ही दुग्ध व्यवसायातून चांगली कमाई करू शकता.

दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून सब्सिडीही दिली जाते. डेअरी बिझनेससाठी सरकारकडून २०-२५ टक्के अनुदान मिळते. हे अनुदान प्रत्येक राज्यांत वेगवेगळे असते. प्रत्येक राज्यात दुग्ध सहकारी समिती असते ती दुग्ध उत्पादन वाढवण्याठी मदत करते.

जर तुम्ही सब्सिडी घेऊन बिझनेस करू इच्छित असाल तर सर्वात आधी आपल्या राज्यातील दुग्ध उत्पादन सहकारी समितीशी चर्चा करा. सुरुवातीला तुम्ही कमी पशुधनात बिझनेस सुरू करू शकता. दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची सहकारी समितीशी संपर्क साधा.

जर तुम्ही १० पशु घेऊन डेअरी फार्मिंग करत असाल तर त्यासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चरही बनवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला १० बाय ५० फूट जागा हवी. एक गाय किंवा म्हैशीला १० बाय ५ फूट जागा लागते. जमिनीची किंमत त्या त्या राज्यातील लोकेशनवर अवलंबून आहे.

जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्याकडे जमीन असेल तर तो खर्च वाचू शकतो. शेड बांधण्यासाठी तुम्हाला ४०-५० हजार खर्च येऊ शकतो. जर तुम्ही १०-१० लीटर रोज दूध घेणारी गाय घेतली तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येकी ५०-६० हजार मोजावे लागतील. म्हणजे तुम्हाला ५-६ लाख खर्च येईल.

सरकारकडून या व्यवसायासाठी तुम्हाला १.५ ते २.५ लाख रुपये अनुदान मिळते. शेड आणि गाय-म्हैस यांच्यावर तुम्हाला एकदाच खर्च करावा लागतो. उदा. एक गाय १० लीटर दूध देते म्हणजे १० गाय १०० लीटर दूध देईल. तुम्ही दूधविक्री कशी करता यावर तुमचा नफा ठरतो.

जर तुम्ही सरकारी डेअरीला विकलं तर प्रति लीटर ३५-४० रुपये मिळतील. खासगी दुकानदार, संस्थांना विकलं तर ६०-७० रुपये प्रति लीटर मिळतील. जर ६० रुपये लीटर दुध विकलं तर दिवसाला १०० लीटरचं ६ हजार कमाई होईल. म्हणजे महिन्याकाठी तुम्हाला १.८० लाख रुपये मिळतील.

गाय देखभाल, खाद्य यासाठी प्रति गाय महिन्याला २००० ते २५०० खर्च येतो. म्हणजे १० गायींसाठी २०-२५ हजार खर्च अपेक्षित आहे. म्हणजे दर महिन्याला खर्च वगळता १.५५ लाख रुपये नफा आहे. हा नफा तुम्ही गाय खरेदी आणि इन्फ्रास्ट्रक्चरशी जोडू नका. पहिले ६ महिने तुम्हाला पैसे वसूल होतील.

डेअरी बिझनेससाठी चांगल्या प्रतीच्या गायी-म्हशी खरेदी करा. ज्यामुळे दूध उत्पादन जास्त होईल. त्यासाठी तुम्हाला https://epashuhaat.gov.in/ यावर पशु खरेदी करू शकता. जनावारांची योग्य काळजी, साफसफाई करा. गायी-म्हशी जितक्या निरोगी राहतील दूध तितकेच जास्त मिळेल.

इतकेच नाही तर एक गाय जवळपास १० महिने दूध देते. त्यानंतर २ महिने थांबल्यानंतर ती वासराला जन्म देते आणि पुन्हा १० महिने दूध मिळते. डेअरी बिझनेस सुरू करण्यापूर्वी या सर्व गोष्टी ध्यानात ठेवा. जेणेकरून तुम्हाला नफा अधिक मिळेल.