आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:17 IST
1 / 8सध्या चांदीच्या किंमती रॉकेट बनल्या आहेत. ती गुंतवमूकदारांना मालामाल करताना दिसत आहे. आजही (बुधवार) चांदीने मोठी उसळी घेतली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदी 4% टक्क्यांनी वधारली आहे. 2 / 8खरे तर भू-राजकीय तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा कल. यामुळे चांदीच्या किंमती वाढताना दिसत आहेत. 3 / 814 जानेवारीरोजी सकाळच्या सत्रात MCX वर चांदीची किंमत 10,800 रुपयांनी वधारली तब्बल 2,86,100 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचली. 4 / 8चांदी मंगळवारी 2,75,300 रुपयांवर ती बंद झाली होती. अर्थात आता चांदीने 3 लाख रुपयांच्या दिशेने आगेकुच केली आहे.5 / 8का वाढतोय चांदीचा भाव? - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना ताब्यात घेतले. आता अमेरिकेची ग्रीनलँड घेण्याची नवी धमकी आणि शासनाविरोधातील इराणमधील हिंसक निदर्षने, यांमुळे गुंतवणूकदारांचा अथवा लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीकडील कल वाढला असल्याचे ब्लूमबर्गने म्हटले आहे.6 / 8सोनं 5000 डॉलर तर चांदी 100 डॉलर प्रति औंसवर पोहोचण्याची शक्यता - सिटीग्रुप इंक. च्या विश्लेषकांनी पुढील तीन महिन्यांत सोने आणि चांदीच्या किमती अनुक्रमे ५००० डॉलर प्रति औंस आणि १०० डॉलर प्रति औंसने वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. 7 / 82025 मध्ये चांदीचा वेग सोन्यापेक्षाही अधिक - गेल्या वर्षात चांदीच्या दरवाढीच्या वेगाने सोन्यालाही मागे टाकले होते. ऑक्टोबर महिन्यात शॉर्ट स्क्वीज आणि लंडनमध्ये सततच्या पुरवठ्यातील कमतरतेने जवळपास 150% ची वाढ झाली होती.8 / 82025 मध्ये चांदीचा वेग सोन्यापेक्षाही अधिक - गेल्या वर्षात चांदीच्या दरवाढीच्या वेगाने सोन्यालाही मागे टाकले होते. ऑक्टोबर महिन्यात शॉर्ट स्क्वीज आणि लंडनमध्ये सततच्या पुरवठ्यातील कमतरतेने जवळपास 150% ची वाढ झाली होती.