NPS Vatshalya Scheme: आता मुलांच्या नावे NPS मध्ये पालक करू शकणार गुंतवणूक, Budget मध्ये NPS Vatshalya Schemeची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 09:35 IST
1 / 7NPS Vatshalya Scheme: राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) ही सरकारद्वारे चालविली जाणारी कॉन्ट्रिब्युटरी पेन्शन योजना आहे, जेणेकरून निवृत्तीनंतरही उत्पन्नाची खात्री करता येईल. या योजनेअंतर्गत तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते. 2 / 7पण आता पालकांना मुलांच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना 'एनपीएस वात्सल्य योजने'ची घोषणा केली आहे.3 / 7या योजनेत पालक किंवा कायदेशीर पालक अल्पवयीन मुलांसाठी योगदान देऊ शकतील. अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी १८ वर्षांचा किंवा वर्षांची झाल्यावर ही स्कीम सामान्य एनपीएस खात्यात रूपांतरित केली जाऊ शकते. 4 / 7याशिवाय एनपीएससाठी आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही महत्त्वाची घोषणा म्हणजे नियोक्त्याचं योगदान १० टक्क्यांवरून १४ टक्के करण्यात आले आहे.5 / 7सध्या रिटायरमेंट प्लॅनच्या दृष्टीने सुरू असलेली ही योजना मार्केट लिंक्ड स्कीम आहे. यापूर्वी ही योजना केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र २००९ पासून सरकारने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू करण्यात आली. त्यात दोन प्रकारे पैसे गुंतवले जातात. पहिला टियर-१ आणि टियर-२.6 / 7एनपीएस टियर-१ हे सेवानिवृत्ती खातं आहे, तर टियर-२ हे ऐच्छिक खातं आहे. खातं उघडताना तुम्हाला टियर १ मध्ये ५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यानंतर टियर २ मध्ये १००० रुपये टाकावे लागतील. प्रत्येक आर्थिक वर्षात हे योगदान द्यावं लागतं. 7 / 7निवृत्तीच्या वेळी एनपीएसमधील एकूण ठेवीच्या ६० टक्के रक्कम काढता येते, तर उर्वरित ४० टक्के रक्कम पेन्शन योजनेत जाते. एनपीएसमध्ये गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. ४० टक्के एन्युटीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी वृद्धापकाळात तुमचं पेन्शन चांगलं होईल.