दंड नको तर लक्षात ठेवा 'या' तारखा, असे आहे नोव्हेंबरचे 'इन्कम टॅक्स कॅलेंडर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:24 IST
1 / 7आयकर विभागाच्या विविध करविषयक कामासाठी निश्चित कालमर्यादा ठरलेली आहे. त्याला 'इन्कम टॅक्स कॅलेंडर' असे म्हटले जाते. या कालमर्यादा न पाळल्यास करदात्यास दंड भरावा लागतो. नोव्हेंबर २०२४ मधील 'इन्कम टॅक्स कॅलेंडर' बद्दल जाणून घेऊ या.2 / 7७ नोव्हेंबर : ऑक्टोबर २०२४ मध्ये कापलेला कर जमा करण्याची अंतिम तारीख आहे. ४ नोव्हेंबर : सप्टेंबर २०२४ मध्ये कलम १९४-आयए, १९४-आयबी, १९४-एम आणि १९४-एस अनुसार केलेल्या कपातीचे टीडीएस सर्टिफिकेट जारी करण्याची तारीख आहे.3 / 7१५ नोव्हेंबर : सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीतील टीडीएस सर्टिफिकेट (वेतनेतर उत्पन्न) जारी करण्याची तारीख आहे.4 / 7३० नोव्हेंबर : ऑक्टोबरमध्ये कलम १९४-आयए, १९४-आयबी, १९४-एम आणि १९४-एस अनुसार कापण्यात आलेल्या कराशी संबंधित चालान-कम-स्टेटमेंट सादर करण्याची तारीख आहे.5 / 7(फॉर्म-६४) वित्त वर्ष २०२३-२४ मधील वितरित उत्पन्नाशी संबंधित व्हेंचर कॅपिटल कंपनी अथवा व्हेंचर कॅपिटल फंड यांच्याकडून इन्कम डिस्ट्रिब्युशन स्टेटमेंट सादर करणे आवश्यक. वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये यूनिट होल्डर्सना बिझनेस ट्रस्टकडून वितरित उत्पन्नाचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.6 / 7कंपनी कलम ३५ (२एबी) अनुसार वेटेज डिडक्शनसाठी पात्र असेल तर तिला अकाउंट ऑडिटची प्रत (कंपनीचे काही आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर्गत विशेष व्यवहार असल्यास) सेक्रेटरीस द्यावी लागेल.7 / 7आयकर विवरण पत्र जमा करण्याची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ असल्यास नियम ५ डी, ५ ई आणि ५ एफ अनुसार वैज्ञानिक संशोधन संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये अथवा विशिष्ट संशोधक कंपनी यांना स्टेटमेंट सादर करावे लागेल.