शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 10:54 IST

1 / 8
गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंब सातत्याने चर्चेत आहे. एक दिवसापूर्वीच सीबीआयने अनिल अंबानींच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. तर दोन दिवसांपूर्वी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी आजारी असल्याची बातमी आली होती.
2 / 8
उद्योगपती मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या आरोग्याबद्दलची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या आर्थिक मालमत्तेबद्दल एक महत्त्वाचा आणि आश्चर्यकारक खुलासा झाला आहे.
3 / 8
रिलायन्स ग्रुपची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अंबानी कुटुंबातील सर्वाधिक शेअर्स हे मुकेश किंवा अनिल अंबानी यांच्याकडे नसून, त्यांची आई कोकिलाबेन अंबानी यांच्याकडे आहेत.
4 / 8
अंबानी कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या कोकिलाबेन अंबानी यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वाधिक शेअर्स आहेत. या यादीत मुकेश अंबानी किंवा त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे नावही नाही.
5 / 8
कोकिलाबेन यांच्याकडे १,५७,४१,३२२ शेअर्स आहेत, म्हणजेच कंपनीमध्ये त्यांची ०.२४ टक्के हिस्सेदारी आहे. ही हिस्सेदारी कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याच्या वैयक्तिक हिस्सेदारीपेक्षा जास्त आहे.
6 / 8
कोकिलाबेन यांच्याकडे असलेल्या शेअर्सची किंमत अनेक हजार कोटी रुपये आहे. सध्या बीएसईवर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत अंदाजे १४०९.३० रुपये आहे. त्यानुसार, कोकिलाबेन यांच्याकडे असलेल्या शेअर्सचे एकूण मूल्य २२ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती याच आकड्याच्या आसपास आहे.
7 / 8
आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, त्यांच्यानंतर या शेअर्सचे खरे मालक कोण असतील? मुकेश अंबानी की अनिल अंबानी? किंवा कुटुंबातील इतर कोणताही सदस्य या शेअर्सचा हक्कदार असू शकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
8 / 8
गेल्या काही वर्षांपासून रिलायन्सच्या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या ६ महिन्यांत रिलायन्सच्या शेअरमध्ये १६% नी वाढ झाली आहे. तर, चालू वर्षात आतापर्यंत १५.४५% ची वाढ नोंदवली गेली आहे.
टॅग्स :Relianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीAnil Ambaniअनिल अंबानीshare marketशेअर बाजार