शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 01:21 IST

1 / 7
नोएल टाटा यांनी टाटा उद्योग समूहातील अनेक कंपन्यांची जबाबदारी सांभाळली आहे. टाटा ट्रेंट इतका लोकप्रिय ब्रॅण्ड बनवण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.
2 / 7
रिपोर्टनुसार नोएल टाटा आठवड्यातील साडेसहा दिवस काम करतात. म्हणजे कुटुंबासाठी त्यांच्याकडे केवळ अर्धा दिवसच असतो.
3 / 7
नोएल टाटा हे मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर असतात. त्यांचा तो स्वभाव आहे. जर त्यांना नाशिक किंवा पुण्यातील स्टोर बघायचे असतील, तर रविवारची निवड करतात. त्यांना हायस्पीड कार चालवण्याची आवड आहे. ते आताही अधूनमधून पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर कार चालवतात, असे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते.
4 / 7
नोएल टाटांबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे ते अस्खलित हिंदी, इंग्रजी भाषेत ते बोलतात.त्याचबरोबर त्यांना फ्रेंच भाषाही येते. त्यांचे या भाषेवर चांगले प्रभुत्व आहे.
5 / 7
कामानिमित्ताने परदेशात असतानाच त्यांनी फ्रेंच भाषा शिकली असे सांगितले जाते. नोएल टाटा हे टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे चेअरमन आणि सीईओ आहेत. गेल्या ४० वर्षांत त्यांनी टाटा समूहातील वेगवेगळ्या कंपन्यांची जबाबदारी घेऊन काम केले आहे.
6 / 7
नोएल टाटा यांचं लग्न आयर्लंडमधील सगळ्यात श्रीमंत कुटुंबातील मुलीशी झालेलं आहे. त्यांनी शापूरजी पालोनजी समूहाचे प्रमुख पालोनजी यांच्या मुलीसोबत लग्न केले.
7 / 7
पालोनजी यांच्या कन्या आलू मिस्त्री यांच्यासोबत नोएल टाटा यांचे लग्न झालेलं आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार पालोनजी कुटुंबाची नेटवर्थ २०२१ मध्ये १७ लाख कोटी रुपये होती.
टॅग्स :Noel Tataनोएल टाटाTataटाटाRatan Tataरतन टाटा