शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nitin Gadkari: खूशखबर! नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा; नव्या वर्षात वाहन खरेदी करणाऱ्यांची होणार चांदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 4:16 PM

1 / 6
जर आपणही नव्या वर्षात वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपली चांदी होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतकर, इलेक्ट्रिक वाहने (electric vehicle) खरेदी करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
2 / 6
राज्य सरकारप्रमाणेच केंद्र सरकारही देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना तयार करत आहे. देशात लवकरच मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने दिसतील, असे नितीन गडकरी यांनी अनेकवेळा म्हटले आहे.
3 / 6
अनेक राज्यांमध्ये झाली आहे सब्सिडीची घोषणा - देशात उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी जाहीर करण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, केंद्र सरकार लवकरच यासंदर्भात मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. यानंतर सर्वसामान्यांना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे अत्यंत सोपे होईल. म्हत्वाचे म्हणजे, यासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून संकेतही दिले गेले आहेत.
4 / 6
महागड्या पेट्रोल-डिझेलपासून मिळणार दिलासा - देशातील वाढत्या प्रदूषणाबाबत केंद्र सरकार अत्यंत चिंतित आहे. यामुळे देशभरात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. सरकार या वाहनांवर सब्सिडी देण्याची योजना तयार करण्याच्या विचारात आहे. देशात जानेवारी महिन्यापासूनच इलेक्ट्रिक वाहनांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या महागड्या किंमती आणि प्रदूषणापासूनही दिलासा मिळू शकेल, असे मानले जात आहे.
5 / 6
चालवायला किती खर्च येतो? - सरकारने म्हटले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहन चालवायला कमी खर्च येतो. आजचा विचार केल्यास, पेट्रोलवरील गाडी चालवायला 7 रुपये प्रति किमी एढा खर्च येतो. तर, इलेक्ट्रिक वाहन चालवायला 1 रुपया प्रति किमी एढा खर्च येतो.
6 / 6
चार्जिंग प्वाइंटसंदर्भात सुरू आहे चर्चा - दिल्ली एनसीआरसह देशातील मुख्य ठिकाणी चार्जिंग प्वाइंट्स देखील तयार करण्यावर चर्चा सुरू आहे. यामुळे गाडीच्या चार्जींगचा प्रश्नही दूर होईल. एवढेच नाही, तर देशात 6 ग्रीन इलेक्ट्रिक हायवे लवकरच तयार होण्याच्या मार्गावर आहेत.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरcarकारElectric Carइलेक्ट्रिक कार