शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

New Rules 1 January 2026: LPG सिलिंडरपासून ते बँकिंग आणि टॅक्स पर्यंत, नव्या वर्षात काय काय बदललं? सामान्यांवर होणार थेट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:51 IST

1 / 10
दर महिन्याला देशात काही ना काही बदल होत असतात, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या जीवनावर होतो. आजपासून म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून सोशल मीडिया, एलपीजी दर, बँकिंग आणि टॅक्स संदर्भात अनेक नवीन नियम लागू झाले आहेत. या बदलांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
2 / 10
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन आले आहे. आजपासून देशभरात ८ वा वेतन आयोग लागू झाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. अधिकृत आकडा अद्याप समोर आला नसला तरी, अंदाजानुसार पगारात २० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. परंतु याची रक्कम येण्यासाठी थोडा कालावधी लागू शकतो.
3 / 10
युनिफाइड टॅरिफ सिस्टममध्ये झालेल्या बदलांमुळे सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) किमती कमी होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीएनजीच्या दरात प्रति किलो १.२५ ते २.५० रुपयांची कपात होऊ शकते, तर घरगुती पीएनजीच्या दरात प्रति एससीएम ०.९० ते १.८० रुपयांची घट होण्याची शक्यता आहे.
4 / 10
रिझर्व्ह बँकेने (RBI) डिसेंबरच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. याचा फायदा कर्जदारांना मिळणार असून बँकांचे व्याजदर कमी झाल्यामुळे तुमच्या घराच्या किंवा कारच्या कर्जाचा मासिक हप्ता (EMI) कमी होऊ शकतो.
5 / 10
गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात. आज गॅस एजन्सींनी दरांमध्ये बदल केला असून यामुळे सर्वसामान्यांच्या मासिक खर्चावर परिणाम होईल. १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरच्या दरात १११ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यानंतर मुंबईत हा सिलिंडर १६४२.५० रुपयांना मिळणार आहे.
6 / 10
२०२६ पासून लहान मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत कडक नियम लागू केले जात आहेत. १६ वर्षांखालील मुलांना आक्षेपार्ह मजकूर पाहण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
7 / 10
सरकारनं गेल्या वर्षी नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर केलं होतं. या अंतर्गत कर रचनेत अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. हे नवीन नियम एप्रिल २०२६ पासून पूर्णपणे लागू होतील. तसंच वस्तू आणि सेवांवरील (GST) कपातीचा फायदाही सर्वसामान्यांना मिळत राहील.
8 / 10
पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली आहे. ज्यांनी हे काम अद्याप केलेले नाही, त्यांना आता दंड भरून लिंक करावे लागेल. लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रीय होऊ शकते.
9 / 10
ज्या रेशन कार्डधारकांनी ३१ डिसेंबरपर्यंत आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना १ जानेवारीपासून रेशन मिळणं बंद होऊ शकते. ही प्रक्रिया तुम्ही मोबाईलद्वारे किंवा जवळच्या रेशन दुकानात जाऊन पूर्ण करू शकता.
10 / 10
ह्युंदाई, निसान, एमजी सारख्या कंपन्यांच्या कारच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये २ ते ३ टक्क्यांनी वाढ झाली. इनपुट कॉस्ट, लॉजिस्टिकचा खर्च आणि करन्सी फ्लक्चुएशनमुळे कारच्या किमती वाढल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.
टॅग्स :businessव्यवसायGovernmentसरकारIncome Taxइन्कम टॅक्सPan Cardपॅन कार्डInflationमहागाईCylinderगॅस सिलेंडरAadhaar Cardआधार कार्ड