Nazara Technologies : ग्रे मार्केटमध्ये ८० टक्के प्रिमिअमवर शेअर; राकेश झुनझुनवालांची आहे कंपनीत गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 13:50 IST
1 / 15गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया प्लॅटफॉर्म नझारा टेक्नॉलॉजीचा आयपीओ बुधवारी (१७ मार्च) लाँच झाला. कंपनी या आयपीओद्वारे ५८२.९१ कोटी रूपये उभारण्याच्या तयारीत आहे. 2 / 15यामध्ये कोणताही नवा शेअर जारी करण्यात येणार नाही. विद्यमान शेअर धारकांद्वारे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून निधी गोळा केला जाणार आहे. 3 / 15हा आयपीओ १९ मार्चपर्यंत खुला राहिलं. या इश्यूसाठी ११०० ते ११०१ रूपयांचा प्राईज बँड ठरवण्यात आला आहे. 4 / 15नझारा टेक्नॉलॉजी या कंपनीत शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांचा ११ टक्के हिस्सा आहे. परंतु ते आपला हिस्सा कमी करणार नाहीत. 5 / 15सध्या या आयपीओसाठी गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. 6 / 15ग्रे मार्केटमध्ये नझारा टेक्नॉलॉजीच्या शेअर्सचा प्रिमिअम वाढला आहे. ग्रे मार्केटमध्ये हे शेअर ८४०-८५० रूपयांच्या प्रिमिअमवर पोहोचले आहेत. 7 / 15आयपीओसाठी इश्यू प्राईज ही ११००-११०१ रूपये इतकी आहे. याचाच अर्थ हे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ८० टक्के प्रिमिअमवर ट्रेंड करत आहेत. 8 / 15या आयपीओसाठी लॉट १३ इक्विटी शेअर्सचा ठेवण्यात आला आहे. याचाच अर्थ कमीतकमी १३ शेअर्ससाठी बोली लावता येणार आहे. 9 / 15गुंतवणूकदारांना जास्तीतजास्त १३ लॉट साईजसाठी बोली लावता येणार आहे. म्हणजेच जास्तीत जास्त १ लाख ८६ हजार ०६९ रूपयांची गुंतवणूक करता येईल. 10 / 15या आयपीओमझ्ये क्वालिफाईड इन्स्टीट्युशनल बायर्ससाठी ७५ टक्के, नॉन इन्स्टीट्युशनल गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी केवळ १० टक्के आरक्षित ठेवण्यात आले आहे. 11 / 15२००० मध्ये नझारा टेक्नॉलॉजी या कंपनीची स्थापना करण्यात आली असून नितीश मित्रसेन हे या कंपनीचे संस्थापक आहेत. 12 / 15वर्ल्ड क्रिकेड चॅम्पिअनशीप, छोटा भीम, मोटा पतलू सीरिजच्या गेम्ससाठी ही कंपनी प्रामुख्यानं ओळखली जाते. 13 / 15भारत, दक्षिण आफ्रिका, मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट मधील ६० पेक्षा अधिक देशांमध्ये या कंपनीचा व्यवसाय आहे.14 / 15सध्या कंपनीची आर्थिक स्थितीही ठिक आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये कंपनीला तोटा झाला होता. परंतु आर्थिक वर्ष २०१९ मध्ये कंपनी नफ्यात होती. 15 / 15या इश्यूचं व्यवस्थापन आयआयएफएल सिक्युरिटी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि नोमुरा फायनॅन्शिअल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटी करणार आहे. लिंक इनटाईम इश्यूची रजिस्ट्रार आहे. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई दोन्हीवर लिस्ट होणार आहेत.