4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, फक्त 52 दिवसांत दिले 1,000 टक्के रिटर्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 21:40 IST
1 / 7आपण या वर्षीच्या मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर (Multibagger stock list) ही बातमी आपल्यासाठी फायद्याची असू शकते. आज आम्ही आपल्याला 2022 मधील 4 मल्टीबॅगर पेनी स्टॉक्ससंदर्भात (penny stocks list for 2022) माहिती देणार आहोत. या स्टॉक्सनी आतापर्यंत 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये 1000 टक्क्यांहून अधिकचा परतावा (Stock return) दिला आहे.2 / 71. SEL Manufacturing - SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स 44.40 रुपये (BSE वर 3 जानेवारी 2022) वरून 529.55 रुपयांवर गेला आहे. SEL मॅन्युफॅक्चरिंगच्या स्टॉकने या वर्षी 2022 मध्ये आतापर्यंत 1,092.68 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे.3 / 7या शेअरने 2022 च्या आतापर्यंतच्या 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांना हजार टक्क्यांहून अधिकचा फायदा मिळवून दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यावर्षी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 11.92 लाख रुपये झाली असती.4 / 72. Sezal Glass - सेझल ग्लासचा शेअर 25.50 रुपयांवरून (एनएसईवर 3 जनवरी 2022) आता 287.40 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने 2022 मध्ये आतापर्यंत 1,027.06% एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 11.27 लाख रुपये झाले असते.5 / 73. Kaiser Corporation - कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर 2.92 रुपयांवरून (NSE 3 जानेवारी 2022 रोजी) 33.70 रुपयांवर पोहोचला आहे. या पॅकेजिंग मल्टीबॅगर स्टॉकने 2022 मध्ये आतापर्यंत 1,054.11% चा जबरदस्त परतावा दिला आहे. या वर्षी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ही रक्कम 11.54 लाख रुपये झाली असती.6 / 74. Shanti Educational - शांती एज्युकेशनलचे शेअर्स 99.95 (BSE वर 3 जानेवारी 2022) वरून रु. 867.80 वर पोहोचले आहेत. या शेअरने 2022 मध्ये आतापर्यंत 768.23% चा जबरदस्त परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारांने या शेअरमध्ये यावर्षी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, आज त्याचे 8.68 लाख रुपये झाले असते. 7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)