शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Multibagger Stock: ५ वर्षात ३०००% रिटर्न, ₹३.५ लाखांचे झाले १ कोटी ८ लाख; आता का मारतोय हा शेअर अपर सर्किट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 10:45 IST

1 / 10
Multibagger Stock: स्पाइस लाउंज फूड वर्क्स (Spice lounge food works) या कंपनीचा शेअर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला. या स्मॉल-कॅप शेअरनं १६ जानेवारी रोजी ५% चे अपर सर्किट गाठलं आणि तो ३६.२८ रुपयांवर पोहोचला.
2 / 10
ही तेजी अशा वेळी आली आहे जेव्हा कंपनीने डिसेंबर २०२५ मध्ये सिंगापूरच्या 'प्रिशा इन्फोटेक'चं अधिग्रहण केलं होतं आणि 'विंग झोन'साठी मास्टर फ्रँचायझी अधिकारही मिळवले होते. या अधिग्रहणांमुळे कंपनी फूड सर्व्हिस आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आपला विस्तार करत आहे. परंतु, गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की स्मॉल-कॅप शेअर्समध्ये अनेकदा फंडामेंटल्सऐवजी बाजारभावनेमुळे वेगाने चढ-उतार होतात.
3 / 10
स्पाइस लाउंज फूड वर्क्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी ५% चं अपर सर्किट लागल्यानं तो ३६.२८ रुपये प्रति शेअरवर पोहोचला. यापूर्वी बुधवारी हा शेअर ३४.५६ रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात तो ३५.८० रुपयांवर उघडला होता. विशेष म्हणजे, या तेजीमागे कोणतेही नवीन कारण समोर आलेलं नाही.
4 / 10
डिसेंबर २०२५ मध्ये कंपनीने सिंगापूरच्या प्रिशा इन्फोटेकला १,५०,००० डॉलरमध्ये पूर्णपणे विकत घेण्याची घोषणा केली होती. या खरेदीमुळे कंपनीने फूड सर्व्हिस आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी तंत्रज्ञान-आधारित उपायांच्या (Technology-enabled solutions) क्षेत्रात आपला विस्तार केला आहे.
5 / 10
कंपनीने म्हटलंय की, 'हे अधिग्रहण स्पाइस लाउंज फूड वर्क्स लिमिटेडच्या विस्तार, वैविध्य आणि जागतिक उपस्थितीच्या दीर्घकालीन धोरणाशी सुसंगत आहे. प्रिशा इन्फोटेकच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रामिंग क्षमतांमुळे कंपनीचा डिजिटल पाया मजबूत होईल आणि सिंगापूरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचणं शक्य होईल.'
6 / 10
प्रिशा इन्फोटेक एंटरप्राइझ सॉफ्टवेअर, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञान उपायांमध्ये तज्ज्ञ आहे. यामुळे कंपनीला उत्तम ऑपरेशनल कार्यक्षमता, ग्राहकांशी सुधारित संवाद आणि डेटा-आधारित निर्णय घेण्यास मदत होईल.
7 / 10
यापूर्वी कंपनीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या 'विंग झोन' या क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (QSR) ब्रँडसाठी विशेष मास्टर फ्रँचायझी अधिकार मिळवले आहेत. कंपनी जानेवारी २०२६ मध्ये बंगळुरूच्या कोरमंगला येथे भारतातील पहिलं विंग झोन आउटलेट उघडणार आहे. त्यानंतर बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये आणखी आउटलेट्स उघडण्याची आणि नंतर इतर प्रमुख शहरांमध्ये विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.
8 / 10
स्पाइस लाउंज फूड वर्क्सचा शेअर गेल्या एक महिन्यात ३१% घसरला होता, मात्र गेल्या सहा महिन्यांत त्यात ३% वाढ झाली आहे. दीर्घकालीन विचार केल्यास हा शेअर 'वेल्थ क्रिएटर' ठरला आहे. याने गेल्या एका वर्षात १६४% आणि पाच वर्षांत ३०००% मल्टिबॅगर परतावा दिला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर एखाद्या व्यक्तीनं पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये ३.५ लाख रुपये गुंतवले असते, तर त्या पैशांचे मूल्य आज १ कोटी ८ लाख ५० हजार रुपये झाले असते.
9 / 10
स्पाइस लाउंज फूड वर्क्सचे शेअर्स फक्त BSE वर लिस्टेड आहेत. या शेअरने २४ डिसेंबर २०२५ रोजी ७२.२० रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता, तर १० मार्च २०२५ रोजी तो ७.६९ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता.
10 / 10
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा