याला म्हणतात बम्पर परतावा...! 2 रुपयांचा शेअर थेट 2,940 वर पोहोचला; दिला 145000 टक्क्यांचा छप्परफाड परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 13:33 IST
1 / 8ट्राली बॅग आणि ट्रॅव्हल बॅग तयार करणारी कंपनी सफारी इंडस्ट्रीजने गेल्या काही दिवसांत जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर 2 रुपयांवरून थेट 3000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहेत. 2 / 8या काळात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,45,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 2949 रुपये आहे. तर निचांक 879.90 रुपये एवढा आहे.3 / 81 लाखाचे केले 14 कोटी रुपये - सफारी इंडस्ट्रीजचा शेअर 11 जून 2004 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 2 रुपयांवर होता. तो 15 जून 2023 रोजी बीएसईवर 2940 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात सफारी इंडस्ट्रीजच्या शेअरने 1,46,500 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 4 / 8जर एखाद्या व्यक्तीने 11 जून 2004 रोजी सफारी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता त्याचे 14.74 कोटी होती.5 / 810 वर्षांत शेअरने घेतली 4000 टक्क्यांची उसळी - सफारी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या 10 वर्षांत जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 7 जून 2013 रोजी BSE मध्ये 71 रुपयांवर होता. तो 15 जून 2023 रोजी बीएसईवर 2940 रुपयांवर ट्रेड करत आहे. 6 / 8या काळात कंपनीच्या शेअरने 4030 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्याने 10 वर्षांपूर्वी सफारी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे 41.53 लोख रुपये जाले असते.7 / 8या काळात कंपनीच्या शेअरने 4030 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्याने 10 वर्षांपूर्वी सफारी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे 41.53 लोख रुपये जाले असते.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)