१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 09:34 IST
1 / 7Multibagger Stock: असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तर असे अनेक शे्र्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसानही केलं. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना अभ्यासपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण अशा शेअर बद्दल जाणून घेणार आहोत ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.2 / 7एलीटकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत असून सातत्यानं त्यात अपर सर्किट लागत आहे. शुक्रवारीही, बाजार उघडताच शेअरची किंमत ५% च्या अपर सर्किटवर पोहोचली. गेल्या वर्षभरात, या तंबाखू कंपनीच्या शेअर्सची किंमत ₹२.५१ वरून ₹१८५.८५ पर्यंत वाढली आहे, ज्यामुळे ७३०४.३८% चा चांगला परतावा मिळाला आहे. 3 / 7गेल्या तीन वर्षांत या शेअरमध्ये १६,७५७% आणि गेल्या पाच वर्षांत १७,६००% वाढ झाली आहे. एलीटकॉन इंटरनॅशनलचे शेअर्स बीएसई आणि एनएसई दोन्हीवर लिस्ट आहेत. कंपनीचं बाजार भांडवल ₹२९,७०८.१२ कोटी आहे. जर एखाद्यानं एका वर्षापूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचं मूल्य सुमारे ₹७४ लाख झालं असतं.4 / 7२०२१ पासून, एलीटकॉन इंटरनॅशनल (Elitecon International) देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर तंबाखू उद्योगात सिगारेट, स्मोकिंग मिक्स्चर, शिशा आणि इतर संबंधित उत्पादनांचं उत्पादन आणि विक्रीचं काम करते. कंपनी युएई, सिंगापूर, हाँगकाँग आणि यूकेसह विविध युरोपीय देशांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कार्यरत आहे. कंपनी च्युइंग तंबाखू, स्नफ ग्राइंडर, मॅच लाईट्स, मॅच, मॅचबॉक्स, पाईप्स आणि इतर संबंधित उत्पादनांमध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहे.5 / 7कंपनीने सिगारेटसाठी इनहेल, शिशासाठी अल नूर आणि स्मोकिंग मिक्स्चरसाठी Gurh Gurh सारखे ब्रँड लाँच केले आहेत. एलीटकॉनची निव्वळ विक्री जून २०२५ मध्ये ₹१९९.२३ कोटी होती, जी जून २०२४ मध्ये ₹४९.५६ कोटी होती, म्हणजेच यात ३०१.९८% वाढ झाली आहे.6 / 7जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत त्याचा निव्वळ नफा ₹२०.४१ कोटी होता, जो जून २०२४ मधील ₹४.५४ कोटी होता, म्हणजेच यात ३४९.८६% वाढ झाली आहे. जून २०२५ मध्ये EBITDA ₹२०.९२ दशलक्ष होता, जो जून २०२४ मधील ₹४.९३ कोटी म्हणजेच ३२४.३४% टक्क्यांपेक्षा अधिक होता. गुरुवारी एलीटकॉन इंटरनॅशनलचे शेअर्सही ५% नं वाढून बंद झाले होते. तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या या कंपनीने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे.7 / 7(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)