Multibagger Stock Return 2022 : २४ रुपयांच्या शेअरनं गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न्स; २३ दिवसांत १ लाखाचे झाले ३.७५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:47 IST
1 / 9Share Market Multibagger Stock Return 2022 : सध्या शेअर बाजारात (Stock Market) प्रचंड उलथापालथ होताना आपल्याला दिसत आहे. या वातावरणातही, टेक्सटाईल सेक्टरचा एक स्टॉक असा आहे जो जबरदस्त कामगिरी करत आहे आणि शेअरधारकांना छप्परफाड रिटर्न्स देत आहे. 2 / 9शेअर बाजारातील घसरणीनंतरही (Stock market crash) हा शेअरवर गेल्या ५ सत्रांमध्ये सातत्याने अपर सर्किट लागत होतं. मंगळवारी हा शेअर ४.९९ टक्क्यांनी वधारून ९३.५५ रुपयांचा ऑल टाईम हायवर पोहोचवा. AK Spintex असे या स्टॉकचे नाव आहे. 3 / 9२४ डिसेंबर २०२१ रोजी BSE वर या टेक्सटाईल स्टॉकची किंमत २४.९ रुपये होती. आज २५ जानेवारी २०२२ रोजी हा स्टॉक ९३.५५ रुपयांवर पोहोचला आहे. या काळात, या शेअरनं केवळ २३ ट्रेडिंग सत्रांमध्ये २७५.७ टक्क्यांचा जबरदस्त परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे. 4 / 9जर एखाद्या गुंतवणूकदाराने या पेनी स्टॉकमध्ये २४ डिसेंबर २०२१ रोजी १ लाख गुंतवले असतील तर आज त्या १ लाख रुपयांच्या शेअर्सची किंमत ३.७५ लाख इतकी आहे.5 / 9जर आपण केवळ या महिन्याबद्दल विचार केला तर ३ जानेवारी AK Spintex चा शेअर ३३.५० रुपयांवरुन २५ जानेवारीला ९३.५५ रुपयांपर्यंत पोहोचला. म्हणजेच, केवळ १७ ट्रेडिंग दिवसांत या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना १७९.२५ टक्के इतका चांगला परतावा दिला आहे. 6 / 9याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने २०२२ च्या पहिल्या व्यावसायिक दिवसात १ लाख रुपये गुंतवले असतील, तर आज ही रक्कम २.७९ लाख इतकी आहे. गेल्या ५ ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉक २१ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी या शेअरची किंमत (AK spintex) ७७.०५ रुपये होती.7 / 9ही कंपनी मूळत: AK Processors Pvt Ltd या नावाने आणि स्टाईलने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून सुरू झाली. त्याची सुरुवात ६ ऑक्टोबर १९९४ रोजी झाली. कापडावर प्रोसेसिंग करण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली. 8 / 9नंतर ६ जानेवारी १९९५ रोजी व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी त्याचं रुपांतर कंपनीचे पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून करण्यात आले. 9 / 9ऐंशीच्या दशकात वस्त्रोद्योग क्षेत्रात भरपूर संधी होत्या. वस्त्रोद्योग विकासावर सरकारने भर दिला. या संधीचा लाभ घेण्यासाठी कंपनीने कापड प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.