मुकेश अंबानी संपूर्ण कुटुंबासह महाकुंभला पोहोचले, व्यवस्था पाहून तुमचेही डोळे दिपतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:24 IST
1 / 5प्रयागराज येथील महाकुंभ संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या पवित्र संगमात स्नान करण्यासाठी आता सेलीब्रिटींसह व्हीआयपी गर्दी करू लागले आहेत.2 / 5उद्योगपती गौतम अदानी यांच्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे कुटुंबही महाकुंभला पोहोचले आहे. मुकेश अंबानींसोबत त्यांची आई कोकिलाबेन अंबानी आणि त्यांचा मुलगा आणि सून दोघेही श्रद्धेने स्नान करण्यासाठी महाकुंभला पोहोचले आहेत.3 / 5मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी कुटुंबातील ३० इतर सदस्यही या यात्रेत सहभागी होणार आहेत. सर्वजण दुपारी ३ वाजता प्रयागराजला पोहोचले आहेत.4 / 5१२ जानेवारीला माघ महिना संपणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळेच हा महिना संपण्यापूर्वीच अंबानी कुटुंबीय महाकुंभात माघ महिन्यातील अमृत स्नान करण्यासाठी पोहोचले आहेत.5 / 5यापूर्वी अनेक बॉलिवूड स्टार्स, राजकीय नेत्यांनी कुंभमेळ्याला हजेरी लावत पुण्य पदरात पाडून घेतलं.