1 / 9मेट्रोपोलिस हेल्थकेअर कंपनीची गणना वर्ल्डक्लास पॅथलॉजी लॅबच्या रुपात केली जाते. आज देशभरात याच्या अनेक ब्रान्चेस आहेत. त्यांच्या या यशामागे कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर अमीरा शाह यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये त्यांनी या कंपनीची धुरा सांभाळली होती.2 / 9यानंतर त्यांनी मेहनत आणि नेतृत्वाच्या जोरावर कंपनीला मोठं केलं. एका छोट्याशा खोलीत त्यांचे वडील 'डॉ. सुशील शाह 'लॅबोरेटरी' नावाची पॅथलॉजी लॅब चालवत असत. 3 / 9आज भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी लॅबचा मान या लॅबला मिळाला आहे. सध्या जगातील सात देशांमध्ये ही लॅब सुरू आहे. सध्या जगभरात मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या १७ लॅब कार्यरत आहेत.4 / 9अमीरा शाह यांनी अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून फायनॅन्समध्ये पदवी प्राप्त केली. शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या लॅब व्यवसायाला मोठा ब्रँड बनवण्याचा निर्णय घेतला. 5 / 9सध्या मेट्रोपोलिस ही शेअर बाजारात लिस्टेड कंपनी आहे. कंपनीनं २०१९ मध्ये ही कामगिरी केली. प्रयोगशाळेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला वडिलांसोबत मेट्रोपोलिसमध्ये २.५ कोटी रुपये गुंतवले. सुरुवातीच्या काळात त्यांनी १५ हजार रुपयांच्या पगारावर स्वतःच्या कंपनीत काम केलं. तर आज या कंपनीचं मूल्यांकन ९ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.6 / 9अमीरा शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान आपण कंपनीच्या विस्ताराठी २००५ मध्ये मोठा निधी जमा केल्याचं म्हटलं होतं. यानंतर २०१५ मध्ये मोठी जोखीम घेत त्यांनी ६०० कोटींचं कर्ज घेतलं.7 / 9नव्या व्यावसायिकानं व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी आवश्यक तेवढंच कर्ज घ्यावं आणि याची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत शाह यांनी व्यक्त केलं. जर तुमचं मॉडेल चांगलं असेल तर गुंतवणूकदार तुमच्या प्रोडक्टमध्ये रस दाखवतील असंही त्यांनी सांगितलं.8 / 9लोकांचा विश्वास संपादन करणं हे त्यांच्यापुढील मोठं आव्हान होतं. यासाठी त्यांनी डॉक्टर आणि रुग्णांच्या संबंधांवर लक्ष केंद्रीत केलं. यासाठी त्यांनी इम्पॅथी, इंटेग्रिटी, ॲक्युरसीवर लक्ष केंद्रीत केलं. 9 / 9त्यांच्याकडे उत्तम मेडिकल टीम होती, परंतु सेल्स, मार्केटिंगमध्ये त्यांची कामगिरी चांगली नव्हती. त्यांनी यावर काम केलं आणि मजबूत टीम उभी केली. यानंतर त्यांच्या व्यवसायानं मोठी भरारी घेतली.