मंदीचा आणखी फटका बसणार! आता २ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार, 'या' कंपनीने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:05 IST
1 / 8गेल्या काही महिन्यांपासून जगभरात मंदी आली असून, अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. अॅमेझॉन, फेसबुक सारख्या मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. 2 / 8अजुनही काही कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरुच ठेवली असून आता मॅनेजमेंट कन्सल्टिंग मॅकिन्से अँड कंपनीने २ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा मोठा निर्णय घेतल्याचे नुकत्याच आलेल्या एका अहवालातून समोर आले आहे. 3 / 8मॅकिन्से अँड कंपनीच्या या निर्णयाचा थेट परिणाम मोठ्या प्रमाणावर होणार्या सपोर्ट स्टाफवर होईल ज्यांचा ग्राहकाशी थेट संपर्क नाही.4 / 8ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मॅकिन्से कंपनीत एकूण ४५ हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात, या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, टाळेबंदीचा नेमका आकडा अजून ठरलेला नाही.5 / 8२०२१ मध्ये कंपनीत एकूण १७ हजार लोक काम करत होते, तर पाच वर्षांपूर्वी एकूण २८ हजार कर्मचारी कंपनीत काम करत होते.6 / 8२०२१ मध्ये कंपनीने १५ अब्ज डॉलरची कमाई केली होती आणि २०२२ मध्ये कंपनीने स्वतःचा आकडा पार केला होता. 7 / 8२०२३ ची सुरुवात होताच, Google आणि Swiggy व्यतिरिक्त Amazon, Microsoft, Twilio, Yahoo, Disney, Boeing, Dell, BYJU, OLX, Philips सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना आधीच नोकरीवरून काढून टाकले आहे. 8 / 8'ज्या प्रकारे आम्ही आमच्या क्लायंटसाठी त्यांच्या टीमची रचना करतो, त्याच पद्धतीने आम्ही आमच्या टीमची पुनर्रचना करत आहोत', अशी प्रतिक्रिया मॅकिन्से अँड कंपनीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली.