शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' ५ निर्णयासाठी मनमोहन सिंग यांचा देश कायम ऋणी राहील; कोट्यवधी लोकं घेतायेत लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 10:03 IST

1 / 8
देशाच्या अर्थव्यवस्थेचे शिल्पकार माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरात शोककळा पसरली आहे. ९२ वर्षीय डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक सुधारणा आणि योजना देशाला दिल्या, ज्याचा प्रभाव आजही दिसून येतो. डॉ.मनमोहन सिंग त्यांच्या आर्थिक सुधारणावादी विचार आणि कल्याणकारी धोरणांसाठी ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक कायदे आणि धोरणे स्वीकारली ज्यामुळे लाखो नागरिकांचे जीवन सुधारले. यातही त्यांची ५ कामे अशी आहेत, ज्यासाठी देश त्यांचा सदैव ऋणी राहील.
2 / 8
शिक्षण हक्क कायदा (२००९) : सिंग यांच्या सरकारने ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिला. हा कायदा मुलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरला.
3 / 8
माहितीचा अधिकार (२००५) : या कायद्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला सरकारी माहिती मिळवण्याचा अधिकार दिला, ज्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित झाले.
4 / 8
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (२०१३) : या कायद्याद्वारे देशातील २ तृतीयांश कुटुंबांना परवडणाऱ्या दरात अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी हे पाऊल वरदान ठरले.
5 / 8
भूसंपादन कायदा (२०१३) : विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना बाधित लोकांना योग्य मोबदला देण्यात आला.
6 / 8
वन हक्क कायदा (२००६) : आदिवासी समाजाला त्यांचे परंपरागत जमिनीचे हक्क परत मिळवून देण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल होते.
7 / 8
मनरेगा (२००५) : डॉ. सिंग यांच्या सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा लागू केला, ज्याने प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला एका वर्षात १०० दिवसांच्या रोजगाराचा अधिकार दिला.
8 / 8
१९९१ च्या आर्थिक संकटाच्या काळात अर्थमंत्री म्हणून डॉ. सिंग यांनी देशाला उदारीकरणाच्या मार्गावर नेऊन जागतिक पटलावर नवी ओळख दिली. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या सुधारणा आणि धोरणांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत पाया दिला. त्यांच्या निधनावर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या या योगदानाचे स्मरण करून देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगEconomyअर्थव्यवस्थाcongressकाँग्रेस