कुंभमेळ्यातील पवित्र गंगाजल १० मिनिटांत घरपोच मिळणार; किंमत वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 17:22 IST
1 / 6येत्या २६ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्याची सांगता होणार आहे. तरीही कुंभला जाण्यासाठी गाड्या अजूनही माणसांनी खचाखच भरलेल्या आहेत. लोकांची कुठल्याही परिस्थितीत पवित्र गंगेत स्थान करण्याची इच्छा आहे. तुम्हालाही कुंभला जायचं होतं, मात्र काही कारणास्तव जाऊ शकत नसाल तर काळजी करू नका. कारण, आता घरबसल्या तुम्हाला गंगाजल घरी मिळणार आहे. अर्थात यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे.2 / 6क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटवर हे गंगाजल मिळत आहे. १०० मिली बाटलीची किंमत ६९ रुपये आहे. बाटलीवर लिहिलेल्या माहितीनुसार हे पाणी गंगा आणि यमुनेच्या संगमाचे आहे.3 / 6धार्मिक उत्पादनावर आधारित व्यवसाय ही भारतात नवीन गोष्ट नाही. एकीकडे लोक ते खरेदी करण्यात रस दाखवत असताना दुसरीकडे अनेकजण याकडे संशयाने बघत आहेत.4 / 6या पाण्यावरुन सोशल मीडियावर दोन मत प्रवाह पाहायला मिळत आहे. एक गट याला चांगली सुविधा मानत आहे. तर दुसरा गट धर्माच्या नावाखाली व्यवसाय म्हणत आहेत.5 / 6मात्र, यापूर्वीही अनेक कंपन्यांनी गंगाजल, प्रसाद आणि इतर धार्मिक वस्तूंची ऑनलाइन विक्री केली आहे. परंतु, यामध्ये ब्लिंकिट सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मचा प्रवेशाने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.6 / 6मात्र, यापूर्वीही अनेक कंपन्यांनी गंगाजल, प्रसाद आणि इतर धार्मिक वस्तूंची ऑनलाइन विक्री केली आहे. परंतु, यामध्ये ब्लिंकिट सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मचा प्रवेशाने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.