राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 10:54 IST
1 / 9दर महिन्याच्या 1 आणि 15 तारखेला घरगुती गॅस सिलिंडरचे (LPG Cylinder) दर वाढत आहेत. कमी होण्याचे नावच घेत नाहीएत. एकीकडे कोरोनाची लाट, लॉकडाऊनने लावलेली उत्पन्नाची वाट आणि दुसरीकडे ही वाढती महागाई. सरकारने हात वर करत पेट्रोल, डिझेल, LPG यांचे दर कमालीचे (LPG Cylinder rate hike) वाढविले आहेत. यामुळे जगायचे कसे असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. (LPG Cylinder or Electric stove? what is cheaper to cooking daily food for family)2 / 9देशाची राजधानी दिल्लीमध्ये गॅस सिलिंडरची किंमत 884.50 रुपये झाली आहे. येथील अधिकतर भागात पीएनजी कनेक्शन आहेत. यामुळे दिल्लीतील लोकांना जास्त त्रास नसला तरी देशभरातील अन्य भागांतील घरांचे बजेट कोलमडू लागले आहे. यामुळे बरेचजण एलपीजीऐवजी आता विजेवर (Electricity) जेवण बनवू लागले आहेत. पण खरेच एलपीजीपेक्षा विजेच्या शेगडीवर जेवण बनविणे परवडणारे आहे? चला जाणून घेऊया... (Food making on Electricity.)3 / 9एका अंदाजानुसार जर एका कुटुंबात ५ लोक आहेत आणि त्यांच्या घरात साधे जेवण बनविले गेले तर त्यांना एलपीजीचा खर्च हा जास्त येत नाही. अशा कुटुंबांमध्ये 14.2 किलोंचा एक एलपीजी सिलिंडर हा सरासरी 25 दिवस चालतो. म्हणजेच अर्धा किलो गॅस दररोज वापरला जातो. 4 / 9सिलिंडरच्या किंमतीवरून एका किलोची किंमत 63 ते 65 रुपये (राज्यांनुसार बदलेल) पडते. म्हणजेच दिवसाला 32 रुपयांचा गॅस खर्च होतो. महाराष्ट्रात 35 ते 38 रुपये असू शकतो.5 / 9जर तुम्हाला विजेवर चालणाऱ्या इंडक्शन शेगडीवर (Induction Stove) जेवण (Cooking) बनवायचे असेल तर किती खर्च येईल? जर पाच लोकांसाठी जेवण बनवायचे असेल तर दिवसाला तीने ते चार युनिट वीज वापरली जाते. 6 / 9देशभरात घरगुती वापरासाठी विजेचा दर हा सरासरी 4 रुपये युनिट असा आहे. महाराष्ट्रात थोडा जास्त असेल. जर दोन्ही वेळचे जेवण विजेवर बनवायचे असेल तर 4 युनिटप्रमाणे 16 ते 20 रुपयांचा खर्च येईल. गॅसच्या तुलनेत निम्म्या खर्चात जेवण बनेल.7 / 9इंडक्शन शेगडी ही खूप वर्षांपूर्वी बाजारात आलेली आहे. या शेगडीची किंमत 2000 रुपयांपासून पुढे सुरु होते. ही शेगडी आता ग्रामीण भागात देखील इंडक्शन शेगड्यांची मागणी वाढू लागली आहे. कारण आता जवळपास सगळीकडे भारनियमन कमी किंवा रद्द झालेले आहे. 8 / 9जर इंडक्शन शेगडी घेतली तर त्यासाठी इंडक्शनवर चालणारी इंडक्शन भांडी घ्यावी लागणार आहेत. टोप, कुकर, पातेले आदी गोष्टी इंडक्शन बेस असलेली घ्यावी लागतील. सामान्य भांडी लोखंडी तळ असलेली देखील यावर चालतात, परंतू विज जास्त वापरली जाण्याची किंवा तापण्यासाठी, शिजण्यासाठी जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे शेगडी आणि भांड्यांचा खर्च अधिकचा होऊ शकतो. 9 / 9सध्या लग्न समारंभात इंडक्शन शेगडी, भांडी आदी देतात. त्यामुळे नवीन संसार करणारे असतील किंवा ज्यांच्या घरात अशी गिफ्ट आलेली असतील ते हा नव्याने भांडी, शेगडी घेण्याचा खर्च वाचवू शकतात. (cooking with electricity is cheaper than lpg know more.)