LIC ची दमदार योजना...फक्त एकदा पैसे गुंतवणूक करा अन् आयुष्यवर ₹100000 पेन्शन मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:58 IST
1 / 6LIC New Jeevan Shanti: सरकारी नोकरी करणाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते, पण खासगी नोकरी करणाऱ्यांचे निवृत्तीनंतर उत्पन्न थांबते. खर्च मात्र थांबत नाही, उलट तो वाढत जातो. त्यामुळेच नोकरीत असताना किंवा एखादा लहान-मोठा व्यवसाय करत असताना योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अतिशय गरजेचे आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC कडे एक अशी पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम मिळते.2 / 6 एलआयसीची नवीन जीवन शांती योजना (LIC New Jeevan Shanti Plan) अशी योजना आहे, ज्यामध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करुन तुम्हाला दरमहा निश्चित पेन्शन मिळू शकते. म्हणजेच निवृत्तीनंतर तुमचे उत्पन्न निश्चित होईल आणि तुम्हाला चिंता करण्याची गरज नसेल.3 / 6 निवृत्तीनंतर आयुष्यभर पेन्शन मिळविण्यासाठी एलआयसीची नवीन जीवन शांती योजना अधिक चांगली आहे. एकदा तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले की, तुम्हाला ते विसरून जावे लागेल. तुमच्या निवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षानंतर तुम्हाला दरमहा निश्चित पेन्शन मिळत राहील. जर तुम्ही योग्य वेळी योग्य रक्कम गुंतवली तर तुम्हाला आयुष्यभर वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.4 / 6 गुंतवणुकीच्या अटी आणि शर्ती - नवीन जीवन शांती योजना ही सिंगल पॉलिसी प्लॅन आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त एकदा पैसे भरावे लागतील. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान 1.50 लाख रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकता. तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल, तितकी जास्त पेन्शन मिळेल. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 30 वर्षे आणि कमाल वय 79 वर्षे आहे. 5 / 6 किती पेन्शन मिळेल? आज तुम्ही या योजनेत जितकी जास्त गुंतवणूक कराल, तितके तुमचे पेन्शन जास्त असेल. समजा तुम्ही वयाच्या 55 व्या वर्षी या योजनेत 11 लाख रुपये गुंतवले आहेत. म्हणजे पाच वर्षांनी जेव्हा तुम्ही 60 वर्षांचे व्हाल, तेव्हा तुम्हाला आयुष्यभर दरवर्षी 1,02,850 रुपये पेन्शन म्हणून मिळत राहतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही रक्कम एक महिना, तीन महिने किंवा सहा महिन्यांत घेऊ शकता. 6 / 6 पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नामांकित व्यक्तीला व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळते. ही पॉलिसी कधीही परत करता येते. विशेष म्हणजे त्याची सरेंडर व्हॅल्यू इतर पॉलिसींपेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर तुम्हाला या पॉलिसीवर कर्जाची सुविधा देखील मिळते.