शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC ची जबरदस्त योजना; एकदा पैसे जमा करा अन् मिळवा 1 लाख रुपये पेंशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 4:57 PM

1 / 5
सरकारी मालकीची सर्वात मोठी विमा कंपनी LIC कडे प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी एकापेक्षा एक उत्तम योजना आहेत. LIC च्या पेंशन योजनाही खूप लोकप्रिय आहेत. सामान्यांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी या योजना आणल्या आहेत. या पॉलिसींपैकी एक म्हणजे LIC न्यू जीवन शांती योजना. ही सिंगल प्रीमियम योजना असून, यात एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही दरवर्षी 50,000 रुपये पेंशन मिळवू शकता.
2 / 5
अनेकजण दरमहा आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवतात आणि कुठे ना कुठे गुंतवणूक करतात. प्रत्येकाला सुरक्षित गुंतवणूक हवी आहे, जेणेकरुन भविष्यात कुठलीही आर्थिक अडयण येऊ नये. तुम्हीही हाच विचार करत असाल, तर LIC न्यू जीवन शांती पॉलिसी तुमच्यासाठी योग्य आहे. या योजनेत एकदा सिंगल प्रीमियम भरुन तुम्ही नियमित पेन्शन मिळवू शकता.
3 / 5
एलआयसीची ही पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा 30 ते 79 वर्षे आहे. या योजनेत कोणतेही रिस्क कव्हर मिळत नाही. पण यातील फायदे तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक देतात. ही एलआयसी योजना मिळवण्यासाठी कंपनीने दोन पर्याय दिले आहेत. यापैकी पहिला पर्याय डेफर्ड एन्युटी फॉर सिंगल लाईफ आणि दुसरा डेफर्ड एन्युटी फॉर जॉइंट लाईफ. तुम्ही एका योजनेत गुंतवणूक करू शकता किंवा दोन्ही पर्याय निवडू शकता.
4 / 5
LIC ची न्यू जीवन शांती योजना एक वार्षिक योजना आहे. यात तुम्हाला एक ठराविक पेंशन मिळू शकते. निवृत्तीनंतर तुम्हाला आयुष्यभर निश्चित पेन्शन मिळत राहील. यावर तुम्हाला चांगले व्याजही मिळते. तुम्ही 55व्या वर्षी हा प्लॅन खरेदी केला आणि 11 लाख रुपये जमा केले, तर पाच वर्षांनी तुम्हाला 1,01,880 रुपये मिळतील. सहा महिन्यांच्या आधारे मिळणारी पेन्शनची रक्कम 49,911 रुपये असेल, तर प्रत्येक महिन्यासाठीची पेन्शन 8,149 रुपये असेल.
5 / 5
विशेष म्हणजे न्यू जीवन शांती योजनेसाठी एलआयसीने वार्षिकी दर वाढवले ​​आहेत. LIC ने 5 जानेवारी 2023 पासून वार्षिकी दर वाढवले ​​आहेत. या योजनेत कोणीही गुंतवणूक करू शकतो. तुम्ही हा प्लॅन कधीही सरेंडर करू शकता. यामध्ये किमान 1.5 लाख रुपये गुंतवू शकता, तर यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूकPensionनिवृत्ती वेतन