LIC ची 'डबल' फायदा देणारी पॉलिसी माहित्येय का? दररोज २६० रुपये गुंतवा अन् मिळवा २० लाख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 21:03 IST
1 / 8आपण कमावत असलेली मिळकत एखाद्या योजनेत गुंतवून चांगला परतावा मिळावा अशी मध्यमवर्गीय आणि प्रत्येक नोकरदाराची इच्छा असते. पण सध्याचा कोरोना काळ लक्षात घेता कमी जोखमीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणं बहुतांश लोक पसंती देत आहेत. 2 / 8गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देणारी एलआयसीची (LIC) एक जबरदस्त योजना आहे. एलआयसी जीवन लाभ पॉलिसी (Jeevan Labh Policy) नावाच्या योजनेत तुम्ही गुंतवणुकीचा विचार करु शकता. या पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला चांगली रक्कम हाती मिळू शकते. 3 / 8एलआयसीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या कॅल्क्युलेटरवरील माहितीनुसार LIC Jeevan Labh Policy योजनेत दैनंदिन पातळीवर २६० रुपये गुंतवण्यास सुरुवात केल्यास पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला २० लाख रुपये प्राप्त होऊ शकतात. 4 / 8एलआयसीच्या या योजनेत किमान दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीपासून तुम्ही सुरुवात करु शकता. यासाठी कमाल मर्यादा नाही. तुम्ही कमीत कमी दोन लाख तर जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणुक केल्यामुळे तुम्हाला आयकरात देखील सूट मिळते. 5 / 8LIC ची जीवन लाभ योजना एकूण तीन टर्ममध्ये उपलब्ध आहे. यात १६ वर्ष, २१ वर्ष आणि २५ वर्षांपर्यंतच्या मुदतीसह तुम्ही गुंतवणूक करू शकता. तर योजनेवरील प्रिमिअम मिळकतीचा कालावधी १० वर्षे, १५ वर्षे आणि १६ वर्षे असा आहे. 6 / 8प्रिमिअमची मिळकत तुम्ही त्रैमासिक, सहा किंवा वार्षिक पातळीवर मिळवू शकतो. वयाच्या ८ व्या वर्षापासून ते ५९ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतात. 7 / 8योजनेत तुम्ही दरमहा पातळीवर गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला १५ दिवसांचा ग्रेस पीरियडचीही सुविधा प्राप्त होते. इतकंच नव्हे, तर तीन, सहा किंवा वार्षिक गुंतवणूक करणार असेल तर तुम्हाला ३० दिवसांचा ग्रेस पीरियड दिला जातो. 8 / 8योजना धारकाचा मृत्यू झाल्यास योजनेत गुंतवलेली संपूर्ण रक्कम नॉमिनीला सुपूर्द केली जाते.