शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महिलांना २ लाखांपेक्षा अधिक कमाई करून देईल ही सरकारी स्कीम; कसं कराल अप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 08:56 IST

1 / 7
LIC Bima Sakhi Scheme: देशातील महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशानं सरकारनं गेल्या वर्षी एलआयसीची विमा सखी योजना सुरू केली. या योजनेमुळे दहावी उत्तीर्ण महिलांनाही कमाईची संधी मिळते.
2 / 7
या माध्यमातून महिलांना दरमहा सात हजार रुपयांपर्यंत कमाई करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ७० वर्षे दरम्यान असणं आवश्यक आहे.
3 / 7
या योजनेअंतर्गत दहावी उत्तीर्ण महिलांना एलआयसी एजंट होण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तीन वर्षांत देशभरात दोन लाख विमा सखी तयार करण्याची सरकारची योजना आहे.
4 / 7
ट्रेंड इन्शुरन्स सखी-महिलांना पहिल्या ३ वर्षांसाठी स्टायपेंड देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात. ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्हाला एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी मिळेल.
5 / 7
देशभरातून तयार झालेल्या विमा सखीला प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी महिलेला दरमहा सात हजार रुपये दिले जातील. दुसऱ्या वर्षी दरमहा सहा हजार रुपये तर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये देण्यात येतील. अशा प्रकारे महिला ३ वर्षात २ लाखांहून अधिक कमाई करतील. शिवाय ते आपल्या कमिशनच्या माध्यमातून उत्पन्नही वाढवू शकतात.
6 / 7
विमा सखी योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी त्यांच्याकडे मॅट्रिक/हायस्कूल/दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. १८ ते ७० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पात्र महिलांना शासनातर्फे तीन वर्षांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला विमा एजंट म्हणून काम करतील.
7 / 7
एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://licindia.in/test2. खाली स्क्रोल करा आणि खाली या, खाली तुम्हाला Click here for Bima Sakhi असा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा. येथे मागितलेली माहिती जसं की नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि पत्ता इत्यादी भरा. तुम्ही एलआयसी इंडियाच्या कोणत्याही एजंट/डेव्हलपमेंट ऑफिसर/कर्मचारी/मेडिकल एक्झामिनरशी संबंधित असाल तर त्याविषयी माहिती द्या. शेवटी, कॅप्चा कोड भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीGovernmentसरकार