दररोज केवळ २ रूपयांपेक्षाही कमी खर्च; पाहा Reliance Jio च्या प्लॅनमधील खास ऑफर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 18:46 IST
1 / 10रिलायन्स जिओकडून (Reliance Jio) सातत्यानं ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन आणले जात आहेत. रिलायन्स जिओनं नुकतीच आपल्या ग्राहकांसाठी एक सेवाही सुरू केली आहे.2 / 10या नव्या सेवेद्वारे ग्राहकांना आपल्या Whatsapp चा वापर करून आपला मोबाईल फोन रिचार्ज करता येणार आहे. तर दुसरीकडे कंपनीनं ग्राहकांसाठी काही दिवसांपूर्वी ९८ रूपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन पुन्हा लाँच केला होता.3 / 10परंतु सध्या रिलायन्स जिओकडे असाही एक प्लॅन आहे ज्यात तुम्हाला दिवसाचा खर्च केवळ २ रूपयांपेक्षाही कमी पडेल. परंतु हा जिओ फोनसाठी लाँच करण्यात आलेला प्लॅन आहे. यामध्येही युझर्सना उत्तम सुविधा दिल्या जातात.4 / 10रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी ३९ रूपयांचा एक प्लॅन लाँच केला आहे. जिओ फोनचा हा प्लॅन घेतल्यावर एका खास प्लॅन अंतर्गत ग्राहकांना एक प्लॅन फ्री दिला जातो. याचाच अर्थ ग्राहकांना ३९ रूपयांमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. 5 / 10दररोजचा खर्च पाहिला तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.३९ रूपयांचा खर्च येतो. तसंच कोणत्याही नेटवर्कवर अनिलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते.6 / 10याशिवाय ग्राहकांना २ जीबी डेटाही देण्यात येतो आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येत आहे. 7 / 10जिओ फोनचा आणखी एक चांगला प्लॅन आहे आणि त्याची किंमत ६९ रूपये आहे. यामध्येही एका प्लॅनवर एक प्लॅन फ्री देण्यात येतो. 8 / 10६९ रूपयांच्या प्लॅनची वैधता १४ दिवसांची आहे. परंतु या ऑफर अंतर्गत ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. 9 / 10या प्लॅनचा ग्राहकांना दिवसाचा खर्च हा केवळ २.४६ रूपये इतका येतो. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर ग्राहकांना मोफत कॉलिंगची सुविधाही मिळते.10 / 10या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण १४ जीबी डेटा मिळतो. याशिवाय कंपनी ग्राहकांना जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देते.