Post Office च्या 'या' स्कीममध्ये पैसे गुंतवले तर होतील दुप्पट; पाहा कोणती आहे ही योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 14:40 IST
1 / 15गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारतातही परिस्थिती काही वेगळी नाही. गुंतवणूकदार अनेकदा पैशांची गुंतवणूक करताना विचार करत आहेत.2 / 15अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना एक सुरक्षित गुंतवणूक हवी आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही.3 / 15अशा प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिसची ही स्कीम गुंतवणूकदारांसाठी उत्तम ठरू शकते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी या स्कीममध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं.4 / 15पोस्ट ऑफिसच्या अशा काही स्कीम आहेत. ज्यामध्ये रक्कम भरल्यास ती दुप्पटही होते. 5 / 15अशाच प्रकारची स्कीम आहे ती म्हणजे किसान विकास पत्र स्कीम (Kisan Vikas Patra Scheme). या स्कीममध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही. 6 / 15Kisan Vikas Patra Scheme ही भारत सरकारद्वारे जारी करण्यात आलेली वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. ही स्कीम भारतातील सर्वा पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. 7 / 15यामध्ये मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत मिळते. यामध्ये कमीतकमी १०० हजार रूपयांची गुंतवणूक करणं अनिवार्य आहे.8 / 15या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याच्या रकमेला कोणतीही कमाल मर्यादा नाही. 9 / 15विशेषत: ही स्कीम शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून ते मोठ्या कालावधीसाठी आपले पैसे वाचवू शकतील.10 / 15पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार या स्कीमचा मॅच्युरिटी पिरअड १२४ महिने म्हणजेच १० वर्ष ४ महिने इतका आहे.11 / 15या स्कीममध्ये गुंतवल्यास १२४ महिन्यांमध्ये ही रक्कम दुप्पट होईल. दुसऱ्या तिमाहीपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत यावर ६.९ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.12 / 15जर तुम्ही यामध्ये १ लाख रूपयांची गुंतवणूक करता तर मॅच्युरिटी पिरिअडपर्यंत ही रक्कम २ लाख रूपये होईल.13 / 15यामध्ये जमा रकमेवर जे व्याज देण्यात येतं त्याच आधारावर ही रक्कम दुप्पटही होत जाते. 14 / 15जर तुम्हाला यावर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यावर कमी व्याजदरात कर्जही उपलब्ध करून देण्यात येतं.15 / 15जर तुम्ही कोणत्याही आर्थिक अडचणीत असाल आणि तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली असेल तर यावर कर्ज घेऊन तुम्ही आर्थिक अडचण दूरही करू शकता.