IPL चाहत्यांसाठी गुड न्यूज! जिओस्टारवर ९० दिवस फ्रीमध्ये क्रिकेटचे सामने पाहा; कसा मिळेल लाभ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:09 IST
1 / 5तुम्ही जर क्रिकटचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रिमियर लिगचे सामने आता तुम्ही मोफत पाहू शकणार आहात.2 / 5रिलायन्स जिओने आयपीएल सीझनमध्ये क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी ऑफर सादर केली आहे. जिओ सिम वापरणाऱ्या किंवा नवीन सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त पैसे न खर्च करता ९० दिवसांसाठी हॉटस्टार पाहण्याची संधी मिळेल.3 / 5कंपनी मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर मोफत हॉटस्टार सुविधा देत आहे. याशिवाय कंपनीने JioFiber किंवा AirFiber चे ५० दिवसांचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले आहे.4 / 5कंपनीने सोमवारी जाहीर केले की त्यांनी जिओ सिम वापरकर्त्यांना मोबाइल आणि टीव्हीवर मोफत हॉटस्टार पाहण्याची ऑफर दिली आहे. जुने जिओ सिम वापरणाऱ्या किंवा नवीन सिम खरेदी करणाऱ्या दोन्ही ग्राहकांना ही सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.5 / 5यासाठी तुम्हाला एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रिचार्ज करावे लागेल. ज्यामध्ये आधीच अस्तित्वात असलेला डेटा आणि कॉलिंग सुविधाही मिळणार आहेत.