शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 09:48 IST

1 / 11
इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची १६ सप्टेंबरची अंतिम मुदत उलटून अनेक महिने झाले असले तरी, लाखो करदाते (Taxpayers) अजूनही त्यांच्या रिफंडची वाट पाहत आहेत. बहुतांश रिटर्नची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी, मोठ्या संख्येने लोक वारंवार पोर्टल तपासत आहेत. तुमचा रिफंड येण्यास विलंब का होत आहे आणि यासाठी किती वेळ लागतो, हे सोप्या भाषेत समजून घेऊया.
2 / 11
रिफंड कधी मिळतो? आयकर विभागाच्या नियमांनुसार, ITR ई-व्हेरिफाय झाल्यानंतरच रिफंडची प्रक्रिया सुरू होते. ई-व्हेरिफिकेशननंतर, सामान्यतः ४ ते ५ आठवड्यांच्या आत रिफंड बँक खात्यात जमा होतो. बहुतेक करदात्यांना याच वेळेत पैसे मिळतात. मात्र, रिफंडला विलंब झाल्यास, त्याची काही सामान्य कारणं आहेत.
3 / 11
रिफंड का अडकला? बँक खाते व्हॅलिडेट नसणं : रिफंड केवळ व्हॅलिडेटेड बँक खात्यातच जमा केला जातो. चुकीचा खाते क्रमांक, चुकीचा IFSC कोड किंवा 'अनव्हॅलिडेटेड' खातं यामुळे रिफंडची प्रक्रिया थांबते.
4 / 11
२. पॅन आणि बँक तपशीलांमध्ये विसंगती : जर तुमच्या बँक खात्याचे नाव पॅन कार्डवरील नावाशी जुळत नसेल, तर सिस्टीम रिफंड प्रक्रिया थांबवते.
5 / 11
३. पॅन-आधार लिंक नसणे : विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जर तुमचा पॅन 'इनऑपरेटिव्ह' असेल, तर तुमचा रिफंड अयशस्वी म्हणजेच फेल होईल.
6 / 11
४. चुकीचे डिडक्शन क्लेम आणि 'हाय-व्हॅल्यू' रिफंड: सीबीडीटीचे (CBDT) अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी सांगितल की, काही रिफंड “हाय-व्हॅल्यू” किंवा “रेड-फ्लॅग्ड” श्रेणीत आले आहेत, ज्यांची अतिरिक्त तपासणी आवश्यक आहे.
7 / 11
५. Form 16, 26AS आणि AIS मध्ये विसंगती: जर तुमचं उत्पन्न, टीडीएस किंवा इतर माहिती या तीनही फॉर्ममध्ये जुळत नसेल, तर प्रकरण मॅन्युअल तपासणीसाठी जाते आणि रिफंड थांबतो.
8 / 11
स्टेटस कसा तपासावा? eportal.incometax.gov.in या संकेतस्थळावर जा. लॉग-इन करा. e-File → Income Tax Returns → View Filed Returns निवडा. असेसमेंट इयर (Assessment Year) निवडून View Details उघडा. येथे रिफंड जारी झाला आहे की नाही, तो तपासणीखाली आहे, की एखाद्या माहितीची आवश्यकता आहे, हे कळेल.
9 / 11
स्टेटस कसा तपासावा? eportal.incometax.gov.in या संकेतस्थळावर जा. लॉग-इन करा. e-File → Income Tax Returns → View Filed Returns निवडा. असेसमेंट इयर (Assessment Year) निवडून View Details उघडा. येथे रिफंड जारी झाला आहे की नाही, तो तपासणीखाली आहे, की एखाद्या माहितीची आवश्यकता आहे, हे कळेल.
10 / 11
रिफंड मिळायला किती वेळ लागेल? ज्यांचा डेटा बरोबर आहे, त्यांना ४-५ आठवड्यांमध्ये रिफंड मिळतो. परंतु, ज्यांच्या कागदपत्रांमध्ये किंवा बँक माहितीमध्ये त्रुटी आहेत किंवा ज्यांचे रिफंड 'हाय-व्हॅल्यू' श्रेणीत आहेत, त्यांची प्रक्रिया अधिक काळ चालू शकते.
11 / 11
तुम्ही काय करावं? बँक खाते त्वरित व्हॅलिडेट करा. पॅन-आधार लिंक स्थिती तपासा. Form 26AS, AIS आणि ITR मधील तपशील जुळवा. कोणतीही नोटीस आली असल्यास, त्याला त्वरित उत्तर द्या.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सGovernmentसरकारMONEYपैसा