शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:47 IST

1 / 6
आयकर परतावा भरायचं म्हणजे अनेकांसाठी कठीण काम आहे. त्यासाठी ते सीए किंवा कर सल्लागाराची मदत घेतात. मात्र, आता ही समस्या कायमची दूर होणार आहे. कर भरणे सोपे करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने त्यांच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर 'ई-पे टॅक्स' सुविधा सुरू केली आहे.
2 / 6
यामुळे करदात्यांना पेमेंट करणे सुलभ होणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एका निवेदनात म्हटले आहे की, 'ई-पे कर सुविधा ही करदात्यांना त्यांच्या कर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी एक चांगला, कार्यक्षम आणि सोयीस्कर मार्ग आहे.' यापुढे आता बँकांमधील लांब रांगा, कंटाळवाणा फॉर्म भरण्याची प्रक्रिया आणि कर भरण्याच्या शेवटच्या क्षणी येणाऱ्या चिंता कायमच्या संपणार आहेत.
3 / 6
सर्वसामान्य करदात्यांसाठी सध्याची आयकर भरण्याची पद्धत किचकट वाटत होती. हीच गरज ओळखून आणि करदात्यांना डिजिटली सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलत, प्राप्तिकर विभागाने त्यांच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर 'ई-पे टॅक्स' सुविधा सुरू केली आहे.
4 / 6
ही सुविधा कर भरण्याच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करून वेळेवर भरणा करण्यास करदात्यांना मदत करेल. विशेषतः व्यक्ती आणि लघु उद्योजकांसाठी ही प्रक्रिया अधिक लाभदायक असल्याचे करविभागाने म्हटलं आहे.
5 / 6
ई-पे टॅक्स पोर्टलवर इन्कम टॅक्स, अॅडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट टॅक्स, टीडीएस/टीसीएस, वस्तू आणि सेवा कर, बँकिंग कॅश ट्रान्झॅक्शन टॅक्स इत्यादी भरता येतात.
6 / 6
'ई-पे टॅक्स' ची सुविधा मिळविण्यासाठी, आयकर विभागाच्या वेबसाइट incometax.gov.in ला भेट द्या. तिथे 'ई-पे टॅक्स' हा पर्याय निवडा आणि तुमचा पॅन नंबर आणि आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा. यानंतर तुम्ही सहजपणे कर रक्कम भरू शकता.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयIncome Tax Slabआयकर मर्यादा