शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:18 IST
1 / 9शेअर बाजारातील महारत्न कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (HPCL) आपल्या शेअरधारकांना मालामाल केले आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरने गेल्या केवळ 10 वर्षांतचही कमा केली आहे. 2 / 9जर एखाद्या गुंतवणूकदाराने दहा वर्षांपूर्वी HPCL मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज तिचे मूल्य 25 लाख रुपयांवर पोहोचले असते. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 455 रुपये तर नीचांक 287.55 रुपये एवढा राहिला.3 / 9एक लाखाचे कसे झाले 25 लाख? - HPCL चा शेअर 18 सप्टेंबर 2015 रोजी 112.56 रुपयांवर होता. जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी या शेअमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याल 888 शेअर्स मिळाले असते. गेल्या दशकात HPCL ने आपल्या शेयरधारकांना तीन वेळा बोनस शेअर्स दिले. 4 / 9आता या बोनस शेअर्समुळे एकूण शेअर्सची संख्या वाढून तब्बल 5,994 झाली असती. 22 सप्टेंबर 2025 रोजी HPCL चा शेअर 417.30 रुपयांवर होता. यानुसार, 5,994 शेअर्सचे सध्याचे मूल्य 25.01 लाख रुपये इतके आहे. 5 / 9तीन बोनस शेअर्सचं गिफ्ट - HPCL ने गेल्या दहा वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स देऊन मालामाल केले. सप्टेंबर 2016 मध्ये कंपनीने 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले, म्हणजेच प्रत्येक शेअरवर दोन बोनस शेअर्स. त्यानंतर जुलै 2017 मध्ये 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यात आले, म्हणजेच प्रत्येक दोन शेअर्सवर एक बोनस शेअर. 6 / 9यानंतर, नुकतेच जून 2024 मध्ये पुन्हा 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यात आले. या बोनस शेअर्समुळे गुंतवणूकदारांच्या शेअर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या संपत्ती वाढीवर झाला.7 / 9महत्वाचे म्हणजे, कंपनीमध्ये प्रमोटर्सचा वाटा 54.90 टक्के एवढ आहे. जबकि पब्लिक शेयरहोल्डिंग 45.10 टक्क्यांपर्यंत आहे.8 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)