शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Investment: पोस्टाच्या या योजनांमध्ये मिळतोय बंपर लाभ, पाहा कुठल्या योजनेत किती वर्षांत दुप्पट होतील पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 17:03 IST

1 / 9
जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीची योजना आखत असाल तर आज आम्ही तुम्लाहा अशा योजनांची माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुमचे पैसे अगदी काही वर्षांमध्येच दुप्पट होतील. जाणून घेऊयात या योजनांबाबत...
2 / 9
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर यावेळी ६.८ टक्के व्याज मिळत आहे. ही एक पाच वर्षांची बचत योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून इन्कम टॅक्स वाचवला जाऊ शकतो. या व्याजदराने जर तुम्ही गुंतवणूक केली तर सुमारे १०.५९ वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतील.
3 / 9
पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी खाते योजनेमध्ये यावेळी सर्वाधिक ७.६ टक्के व्याज मिळते. मुलींसाठी चालवण्यात येत असलेल्या या योजनेमध्ये पैसे दुप्पट होण्यासाठी ९.४७ वर्षांचा कालावधी लागेल.
4 / 9
पोस्ट ऑफिसची सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम यावेळी ७.४ टक्के व्याज दिले जात आहे. जर तुमचा पैसा या स्किममध्ये गुंतवलेला असेल तर सुमारे ९.७३ वर्षांमध्ये दुप्पट होईल.
5 / 9
पोस्ट ऑफिसचा १५ वर्षांच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडवर यावेळी ७.१ टक्के व्याज मिळत आहे. म्हणजेच या रेटवर तुमचा पैसा दुप्पट होण्यासाठी सुमारे सुमारे १०.१४ वर्षे एवढा वेळ लागेल.
6 / 9
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमवर यावेळी ६.६ टक्के व्याज मिळत आहे. या व्याजदराने जर पैशांची गुंतवणूक केली तर सुमारे १०.९१ वर्षांत ती दुप्पट होईल.
7 / 9
पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटमध्येही जर तुम्ही तुमचा पैसा ठेवत असाल तर तुम्हाला पैसे दुप्पट होण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागू शकते. कारण यामध्ये केवळ ४ टक्के वार्षिक व्याज मिळते. म्हणजेच तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी १८ वर्षे लागतील.
8 / 9
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवर तुम्हाला आता ५.८ टक्के व्याज दिलं जात आहे. अशा परिस्थितीत या व्याजदराने जर तुम्ही पैशांची गुंतवणूक केली तर ती सूमारे १२.४१ वर्षांत दुप्पट होईल.
9 / 9
पोस्ट ऑफिसच्या १ वर्षापासून ३ वर्षांपर्यंतच्या टाइम डिपॉझिटवर ५.५ टक्के व्याज मिळत आहे. जर तुम्ही यामध्ये गुंतवणूक केली तर तुमचे पैसे १३ वर्षांत दुप्पट होतील. त्याचप्रमाणे ५ वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर तुम्हाला ६.७ टक्के व्याज मिळते. या व्याजदरावर जर पैसे गुंतवले तर तुमचे पैसे सुमारे १०.७५ वर्षांत दुप्पट होतील.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा