शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment Plan:500 रुपयांच्या गुंतवणुकीतून होईल 10 कोटी रुपयांचा फायदा, अशी करा इनव्हेसमेंट...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 6:04 PM

1 / 8
Investment Plan: भविष्याबाबत आत्तापासूनच प्लॅनिंग केले तर म्हातारपणात अडचणी येत नाहीत. तुम्ही अजून गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल तर आताच करा. आज आम्ही तुम्हाला भविष्यात कोट्यवधी रुपयांचा निधी कसा तयार होऊ शकतो, याबाबत सांगणार आहोत.
2 / 8
तुम्ही दररोज फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करुन भविष्यात 10 कोटींहून अधिकचा निधी तयार करू शकता. याचे गणित नेमके कसे जुळवायचे, त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
3 / 8
तुमचे वय 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असेल, तर यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी सर्वात फायदेशीर ठरेल. छोट्या गुंतवणुकीत तुम्ही मोठा फंड कसा बनवू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
4 / 8
समजा सध्या तुमचा पगार 50,000 रुपये असेल, तर 70:30 च्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही दरमहा 15 हजार रुपये बाजूला काढून ठेवले पाहिजेत. म्हणजेच दरमहा 15 हजार रुपयांची गुंतवणूक झाली पाहिजे.
5 / 8
रोज छोटी गुंतवणूक करून मोठा फंड सहज तयार करता येतो. आम्ही तुम्हाला जी योजना सांगत आहोत, ती 30 वर्षांसाठी करावी लागेल. समजा तुम्ही आता 25 वर्षांचे आहात. तुम्ही आता गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुमच्याकडे वयाच्या 55 व्या वर्षी 10 कोटींचा निधी असेल.
6 / 8
दुसरीकडे, जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी 10 कोटींचे मालक व्हाल.
7 / 8
500 रुपये प्रतिदिन म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 15000 रुपये गुंतवावे लागतील. या रकमेची SIP केल्याने तुम्हाला 10 कोटी रुपयांचा निधी सहज मिळेल. गेल्या काही वर्षांत, म्युच्युअल फंडांनी 15 ते 20 टक्के किंवा त्याहून अधिक परतावा देतो.
8 / 8
तुम्ही दर महिन्याला 15 हजार रुपयांची SIP करत असाल तर 30 वर्षांत तुम्ही 54 लाख रुपये गुंतवता. जर तुम्हाला यावर 15% परतावा मिळाला तर 30 वर्षात ते 10.51 कोटी रुपये होईल. (डिस्केमर: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कृपया कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकfundsनिधीMONEYपैसा