Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 09:28 IST
1 / 8Post Office Time Deposit: बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. अशा काही योजना आहेत ज्यावर पोस्ट ऑफिसमध्ये बँकेपेक्षा चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट हाही त्यापैकीच एक आहे. सामान्य भाषेत याला पोस्ट ऑफिस एफडी म्हणतात. सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत असाल तर पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता.2 / 8पोस्ट ऑफिसमध्ये १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी एफडीचा पर्याय उपलब्ध आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा त्यात आधीच गुंतवणूक केली असेल तर तुम्ही भरपूर व्याज कमवू शकता आणि तुमची रक्कम दुप्पट करू शकता. म्हणजेच तुम्ही मूळ रकमेपेक्षा जास्त कमाई करू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. जाणून घेऊ आपल्या फायद्याची गोष्ट.3 / 8पोस्ट ऑफिस योजनेत मुदतीनुसार वेगवेगळं व्याज दिलं जातं. एक वर्षाच्या एफडीमध्ये गुंतवणूक ६.९ टक्के, दोन वर्षांच्या एफडीवर ७ टक्के, तीन वर्षांच्या एफडीवर ७.१ टक्के आणि पाच वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज मिळतं. 4 / 8पण जर तुम्हाला तुमची रक्कम दुपटीपेक्षा अधिक करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ५ वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर ही एफडी पुढील ५ वर्षांसाठी वाढवावी लागेल. ५ वर्षांच्या एफडीवर टॅक्स बेनिफिट देखील मिळते.5 / 8जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला ७.५% दरानं व्याज मिळेल. पोस्ट ऑफिस कॅलक्युलेटरनुसार, ५,००,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ५ वर्षात २,२४,९७४ रुपये व्याज म्हणून मिळतील म्हणजेच मॅच्युरिटीवर एकूण ७,२४,९७४ रुपये व्याज म्हणून मिळतील. 6 / 8पण जर तुम्ही ती एक्सटेंड केली म्हणजेच ती ५ वर्षांसाठी वाढवून चालू ठेवली तर एकूण १० वर्षात तुम्हाला त्यावर ५,५१,१७५ रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुमचं व्याज मूळ रकमेपेक्षा जास्त असेल. १० वर्षात तुम्ही १०,५१,१७५ रुपयांचे मालक व्हाल.7 / 8पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खातं मुदतपूर्तीच्या तारखेपासून ठराविक कालावधीपर्यंत वाढवलं जाऊ शकते. मॅच्युरिटीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत १ वर्षांची एफडी, मॅच्युरिटी पीरियडच्या १२ महिन्यांच्या आत २ वर्षांची एफडी आणि मॅच्युरिटी पीरियडच्या १८ महिन्यांच्या आत ३ आणि ५ वर्षांच्या एफडीला मुदतवाढ दिली जाऊ शकते. 8 / 8याशिवाय खातं उघडताना मॅच्युरिटीनंतर अकाऊंट एक्सटेन्शनची विनंतीही करू शकता. मुदतपूर्तीच्या दिवशी संबंधित टाईम डिपॉझिट खात्यावर लागू होणारा व्याजदर वाढीव कालावधीवर लागू होईल.