शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारतात का वाढतेय इन्फ्लुएंसर बनण्याची क्रेझ? यातील पैसा आणि आकडेवारी पाहून विश्वास नाही बसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:57 IST

1 / 8
नकतेच एका संस्थेने भारतात 'इन्फ्लुएंसर मार्केटिंग' इंडस्ट्रीची काही आकडेवारी प्रसिद्ध केली, जी थक्क करणारी आहे. KlugKlug या इन्फ्लुएंसर मार्केटिंग SaaS प्लॅटफॉर्मच्या अहवालानुसार, भारतात इन्फ्लुएंसर मार्केटिंगवर तब्बल १०,००० कोटींहून अधिक खर्च झाला आहे. हा आकडा पूर्वीच्या ३,००० ते ४,००० कोटी रुपये या अंदाजित बाजाराच्या आकारापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे.
2 / 8
KlugKlug चे सह-संस्थापक आणि सीईओ कल्याण कुमार यांनी सांगितले की, इन्फ्लुएंसर मार्केटिंगवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी केवळ २५% हिस्साच संघटित आणि सहज दिसणाऱ्या चॅनेल्समधून जातो. उर्वरित ७५% खर्च थेट ब्रँड्स आणि क्रिएटर्समध्ये होतो, ज्यामुळे तो ट्रॅक करणे कठीण होते.
3 / 8
क्रिएटर इकॉनॉमी पारंपारिक पद्धतींनी पूर्णपणे दिसून येत नाही. हजारो मायक्रो आणि नॅनो इन्फ्लुएंसर्स ब्रँड्ससाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करत आहेत. परंतु, त्यांच्या कामाचा परिणाम अनेकदा आकडेवारीत नोंदवला जात नाही.
4 / 8
संघटित क्षेत्राचा विचार केल्यास, भारतात २० हून अधिक अशा इन्फ्लुएंसर मार्केटिंग एजन्सीज आहेत, ज्या वार्षिक २० कोटींहून अधिक महसूल कमावत आहेत. हा आकडा फक्त संघटित क्षेत्राचे चित्र दर्शवतो, तर एकूण उद्योग त्याहून मोठा आहे.
5 / 8
भारतातील वेगाने वाढणारे थेट ग्राहक (D2C) सेक्टर इन्फ्लुएंसर मार्केटिंगची पद्धत बदलत आहे. या क्षेत्रातील १०० हून अधिक D2C ब्रँड्स दरवर्षी २० कोटींहून अधिक खर्च इन्फ्लुएंसर मार्केटिंगवर करत आहेत.
6 / 8
विशेष म्हणजे, हे D2C ब्रँड्स मार्केटिंग एजन्सीजऐवजी त्यांच्या इन-हाऊस क्रिएटर टीम्सद्वारे हा मोठा खर्च करत आहेत. यामुळे खर्चाचा मोठा हिस्सा थेट क्रिएटर्सकडे जात आहे.
7 / 8
Klug Tech चे सह-संस्थापक वैभव गुप्ता यांनी स्पष्ट केले की, भारतीय इन्फ्लुएंसर मार्केटिंगच्या आकडेवारीतील फरक कायम राहिला, कारण हा उद्योग आतापर्यंत एजन्सीजकडून मिळणाऱ्या मर्यादित डेटावर अवलंबून होता, ज्यामुळे बाजाराचा खरा आकार समजू शकला नाही.
8 / 8
कल्याण कुमार यांच्या मते, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, ऑटोमेशन आणि प्रिसिजन टार्गेटिंगच्या युगात इन्फ्लुएंसर मार्केटिंगमध्ये मूलभूत संरचनात्मक बदल झाला आहे. जिथे कॉमर्स, कंटेंट आणि ग्राहकांचा हेतू एका ठिकाणी मिळत आहेत.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलbusinessव्यवसायMONEYपैसा