शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:57 IST

1 / 8
जोधपूर राजघराणे : या राजघराण्याचे प्रमुख महाराजा गज सिंह द्वितीय असून त्यांची संपत्ती अंदाजे २२,००० कोटी आहे. उत्पन्नाचा मुख्य स्रोत हॉटेल व्यवसाय (हॉस्पिटॅलिटी बिझनेस) आहे. त्यांचा जागतिक कीर्तीचा उम्मेद भवन पॅलेस अर्धे निवासस्थान आणि अर्धे आलिशान 'ताज' हॉटेलमध्ये रुपांतरित केले आहे. यातून त्यांची मोठी कमाई होते.
2 / 8
जयपूर राजघराणे : महाराजा पद्मनाभ सिंह आणि दिया कुमारी यांच्याकडे सुमारे २०,००० कोटींची संपत्ती आहे. त्यांचे प्रसिद्ध रामबाग पॅलेस 'ताज' हॉटेलच्या सहकार्याने चालते. यांनी त्यांच्या मालमत्तेचा काही भाग Airbnb द्वारे भाड्याने दिला आहे, जो त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत आहे.
3 / 8
गायकवाड राजघराणे, गुजरात : या कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाजे २०,००० कोटी असून, त्यापैकी बहुतेक संपत्ती जमीन आणि स्थावर मालमत्तेच्या रूपात आहे. मोठ्या जमिनी आणि रिअल इस्टेट व्यवसाय हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. यांच्याकडे गुजरात आणि बनारस येथील मंदिर ट्रस्टचे संचालन असून, राजकारणातही त्यांची चांगली पकड आहे.
4 / 8
मेवाड राजघराणे : महाराणा प्रताप यांच्या वंशातील या ऐतिहासिक कुटुंबाकडे सुमारे १०,००० कोटींची संपत्ती आहे. यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत पर्यटन आहे. उदयपूरचा प्रसिद्ध सिटी पॅलेस आणि इतर ऐतिहासिक महाल त्यांनी आलिशान हॉटेल व संग्रहालयांमध्ये रूपांतरित केले आहेत.
5 / 8
जामनगर राजघराणे : क्रिकेटपटू अजय जडेजा याच कुटुंबातील असून, त्यांची एकूण संपत्ती १४५० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांच्या आर्थिक बळकटीचे कारण म्हणजे त्यांचे मोठे महाल, मौल्यवान दागिने आणि प्रचंड मालमत्तांचा संग्रह. या संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करून ते आजही आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत.
6 / 8
पटौदी नवाब परिवार : या कुटुंबाचे प्रमुख बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खान असून, त्यांची एकूण किंमत सुमारे ८०० कोटी रुपये आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग सैफ अली खान यांच्या चित्रपट कारकीर्दीतून येतो. त्यांचा ऐतिहासिक पटोडी पॅलेस चित्रपट शूटिंग आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी भाड्याने दिला जातो, ज्यामुळे त्यांना चांगली कमाई होते.
7 / 8
वाडियार वंश, म्हैसूर: या वंशाचे सध्याचे प्रमुख यदुवीर कृष्णदत्त चामाराज वाडियार हे आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय सिल्क इंडस्ट्री (रेशीम उद्योग) हा आहे. हे कुटुंब 'म्हैसूर सिल्क'चे निर्माता मानले जाते आणि हा त्यांच्या कमाईचा सर्वात मोठा स्रोत आहे.
8 / 8
अलसीसर परिवार : हे कुटुंब राजस्थानमधील जयपूर आणि रणथंभौर येथील त्यांच्या भव्य महाल आणि हॉटेल्समधून कमाई करते. यांचे प्रमुख अभिमन्यू सिंह हे लोकप्रिय EDM फेस्टिव्हल 'मॅग्नेटिक फील्ड्स'चे मुख्य आयोजक आहेत. हा म्युझिक फेस्टिवल त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याला बळकटी देतो.
टॅग्स :businessव्यवसायMONEYपैसाRajasthanराजस्थानGujaratगुजरात