By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:29 IST
1 / 8हे अॅप केवळ एक टॅक्सी सेवा नसून ‘ड्रायव्हर-ओनरशिप’ मॉडेलवर आधारित एक सहकारी संस्था आहे. ६ जून २०२५ रोजी स्थापन झालेल्या या प्लॅटफॉर्मशी आतापर्यंत ३ लाखांहून अधिक ड्रायव्हर्स आणि १ लाख ग्राहक जोडले गेले आहेत.2 / 8खाजगी कंपन्यांमध्ये ड्रायव्हर्सना त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा कमिशन म्हणून द्यावा लागतो. मात्र, ‘भारत टॅक्सी’मध्ये ड्रायव्हर्सकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. संपूर्ण भाड्याची रक्कम थेट ड्रायव्हरला मिळेल.3 / 8या सहकारी संस्थेत प्रत्येक ड्रायव्हरला ५ शेअर्स दिले जातील, ज्यामुळे ते या प्लॅटफॉर्मचे भागधारक आणि मालक बनतील. ड्रायव्हर्सना फक्त एक अत्यल्प मेंबरशिप फी द्यावी लागेल, जी ते दिवसाला, आठवड्याला किंवा महिन्याला भरू शकतात.4 / 8खाजगी टॅक्सी अॅग्रीगेटर्सच्या तुलनेत भारत टॅक्सीचे भाडे ३० टक्क्यांपर्यंत स्वस्त असणार आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा दिलासा मिळेल.5 / 8पाऊस, गर्दी किंवा मागणी वाढली की खाजगी कंपन्या भाड्यात दुपटीने वाढ करतात. मात्र, भारत टॅक्सीमध्ये ‘सर्ज प्राईसिंग’ नसेल. प्रवाशांना नेहमी पारदर्शक आणि आधीच ठरवलेल्या दरात प्रवास करता येईल.6 / 8या प्लॅटफॉर्मशी जोडल्या जाणाऱ्या ड्रायव्हर्सना ५ लाखांचा वैयक्तिक अपघात विमा आणि ५ लाखांचा कौटुंबिक आरोग्य विमा दिला जाईल. कामासोबतच त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजीही घेतली जाणार आहे.7 / 8मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायद्यांतर्गत, ड्रायव्हर्सना नवीन गाडी खरेदी करण्यासाठी सोप्या हप्त्यांवर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे ड्रायव्हर्स आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या मालकीची गाडी घेऊ शकतील.8 / 8सुरुवातीला ही सेवा दिल्ली-एनसीआरमध्ये सुरू केली जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये ही सेवा टप्प्याटप्प्याने विस्तारली जाईल.