शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Indian Railways: आता रेल्वे प्रवासात जेवणासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार नाहीत, IRCTC कडून नवीन प्लॅन जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 4:35 PM

1 / 12
रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर जाणून घ्या. आता तुम्हाला ट्रेनमधील प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. दरम्यान, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) ट्रेनमधील खाद्यपदार्थांचा मेनू आणि किंमतीची यादी जारी केली आहे. म्हणजेच आता तुम्हाला ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची किंमत समजेल. अशा परिस्थितीत, पेंट्री लोक तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीसाठी जास्त शुल्क घेऊ शकणार नाहीत.
2 / 12
प्रवाशांना स्वादिष्ट पदार्थ देण्यासाठी आयआरसीटीसी ट्रेनमध्येच जेवणाची व्यवस्था करते. मात्र, अनेकवेळा प्रवासी खाद्यपदार्थासाठी जास्त किंमत मागितल्या जात असल्याच्या तक्रारी करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना कोणत्याही गैरसोयीपासून वाचवण्यासाठी आयआरसीटीसीने आपली मेनू यादी जारी केली असून निश्चित किंमतीपेक्षा जास्त पैसे न देण्याची विनंती केली आहे. आयआरसीटीसीने सांगितले की, प्रवासी ऑनलाइन पेमेंटही करू शकतात.
3 / 12
नवीन दरांनुसार प्रवाशांना व्हेज जेवणासाठी स्टेशनवर 70 रुपये आणि ट्रेनमध्ये 80 रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये साधा भात, चपाती किंवा पराठा, डाळ किंवा सांबार, मिक्स्ड व्हेज, दही आणि लोणचे मिळेल.
4 / 12
यामध्ये प्रवाशांना स्टेशनवर 15 रुपये आणि ट्रेनमध्ये 20 रुपये मोजावे लागणार आहेत. जनता जेवणात पुरी आणि बटाट्याची सुकी भाजी मिळते.
5 / 12
व्हेज बिर्याणीसाठी तुम्हाला स्टेशनवर 70 रुपये आणि ट्रेनमध्ये 80 रुपये मोजावे लागतील.
6 / 12
सँडर्ड नॉनव्हेज जेवणासाठी प्रवाशांना स्टेशनवर 80 रुपये आणि ट्रेनमध्ये 90 रुपये मोजावे लागतील. यामध्ये अंडा करी राइस, पराठा किंवा चपाती दही आणि लोणच्यासोबत मिळते.
7 / 12
प्रवाशांना सँडर्ड नॉनव्हेज जेवणसाठी स्टेशनवर 120 रुपये आणि ट्रेनमध्ये 130 रुपये मोजावे लागतील. यामध्ये साधा भात, पराठा किंवा चपाती, चिकन करी, दही आणि लोणची मिळते.
8 / 12
प्रवाशांना अंडा बिर्याणीचे स्टेशनवर 80 रुपये आणि ट्रेनमध्ये 90 रुपये मोजावे लागतात. यामध्ये तुम्हाला दही आणि लोणचेही मिळते.
9 / 12
नवीन मेनूमध्ये प्रवाशांना चिकन बिर्याणी स्टेशनवर 100 रुपये आणि ट्रेनमध्ये 110 रुपये मोजावी लागणार आहेत. यामध्ये तुम्हाला दही आणि लोणचेही मिळते.
10 / 12
स्टेशनवर आणि प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या सामान्य चहासाठी प्रवाशांना 5 रुपये आणि 10 रुपये मोजावे लागतात.
11 / 12
ट्रेनमधील प्रवाशांना स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवर कॉफीसाठी 10 रुपये मोजावे लागतील.
12 / 12
आयआरसीटीसीच्या मेनूनुसार, प्रवाशांना स्टेशन आणि ट्रेनमध्ये रेल्वे नीरच्या (Rail Neer) पाण्याच्या बाटलीसाठी 15 रुपये मोजावे लागतील.
टॅग्स :railwayरेल्वेIRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वे