गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:03 IST
1 / 7मागील सहा महिन्यांत शेअर बाजारात मोठे चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे परतावा घटला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत मीडकॅप आणि स्मॉलकॅप फंड्समध्ये ११ टक्के घसरण झाली आहे.2 / 7अशा परिस्थितीत संपत्ती निर्मितीसाठी स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे. मागील सहा महिन्यांत शेअर बाजारात मोठे चढ-उतार सुरू आहेत.3 / 7त्याचा परिणाम म्हणून परतावा घटला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत मीडकॅप आणि स्मॉलकॅप फंड्समध्ये ११ टक्के घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत संपत्ती निर्मितीसाठी स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.4 / 7वेगवेगळ्या मालमत्ता श्रेणीत गुंतवणूक करावी. पोर्टफोलिओतील ५ ते १० टक्के गुंतवणूक सोन्यात असावी. डेब्ट फंडांत, गिल्ट फंड, डायनॅमिक बाँड फंडांत गुंतवणूक करावी. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक उत्पन्न देते. या पर्यांयांबद्दलही जाणून घ्या. 5 / 7पहिलं म्हणजे शेअर बाजार. सध्या लार्जकॅप फंड्स स्थिर आहेत. यंदा आतापर्यंत केवळ २ टक्के परतावा मिळाला आहे. दुसरं म्हणजे मुदत ठेवी. व्याज दर घटल्यामुळे १ ते १० वर्षांच्या मुदत ठेवी ६ ते ७ टक्के परतावा देत आहेत.6 / 7तिसरा पर्याय आहे सोने-चांदीमध्ये गुंतवणुकीचा. यंदा चांदीने १५ टक्के, तर सोन्याने ४७ टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूक फायद्यात आली.7 / 7टीप: कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.