1 / 6Post Office Schemes Investment: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना टपाल सेवा तसंच विविध प्रकारच्या वित्तीय सेवा पुरवते. पोस्ट ऑफिसमध्ये सामान्य बचत खात्यांव्यतिरिक्त आरडी खाती, टीडी खाती, एमआयएस खाते आणि पीपीएफ खातीदेखील उघडता येतात. 2 / 6पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालणारी सरकारी योजना आहे. आज आपण पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पीपीएफमध्ये दरमहा २००० रुपये जमा केल्यास १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल हेही पाहणार आहोत.3 / 6पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेवर सध्या वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळतं. या योजनेत वर्षाला किमान १००० रुपये जमा करून खातं उघडता येतं. पीपीएफ खाते सक्रिय ठेवण्यासाठी एका आर्थिक वर्षात किमान १००० रुपये जमा करणं आवश्यक आहे. पीपीएफ योजनेत एका वर्षाच्या कालावधीत जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात.4 / 6पीपीएफमध्ये तुम्ही वार्षिक एकरकमी रक्कम जमा करू शकता, याशिवाय पीपीएफ खात्यात हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा करू शकता. पीपीएफ खात्यात तुम्ही एका वर्षाच्या कालावधीत जास्तीत जास्त १२ हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता, म्हणजेच एका महिन्यात जास्तीत जास्त १ हप्ता जमा करू शकता.5 / 6जर तुम्ही पीपीएफ खात्यात दरमहा २००० रुपये जमा केले तर तुमची वार्षिक गुंतवणूक २४,००० रुपये होईल. पीपीएफ खातं १५ वर्षांत मॅच्युअर होतं, असं असलं तरी आपण ते ५-५ वर्षांच्या कालावधीसाठी वाढवू शकतो. जर तुम्ही पोस्ट ऑफिसपीपीएफ योजनेत दरमहा २००० रुपये जमा केले तर तुमची गुंतवणूक एका वर्षात २४,००० रुपये आणि १५ वर्षात ३,६०,००० रुपये होईल. 6 / 6जर तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा २००० रुपये जमा केले तर १५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ६,५०,९१३ रुपये मिळतील. यामध्ये २,९०,९१३ रुपये व्याज म्हणजेच परताव्याचा समावेश आहे. पीपीएफ खातं बँका तसेच पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येतं.