By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:04 IST
1 / 6आजच्या काळात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा मासिक खर्च साधारणपणे ३०००० रुपयांमध्ये मॅनेज होऊ शकतो. यात, घरभाडे, रेशन, वीज-पाणी, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजांचा समावेश आहे. मात्र, महागाईचा वाढता वेग पाहता, याच जीवनशैलीसाठी आपल्याला १० वर्षांनंतर किती पैसा मोजावा लागेल याचा कधी विचार केला का? तर जाणून घेऊयात.2 / 6काळानुसार, व्यक्तीचे उत्पन्न वाढते, तसेच वस्तूंच्या किमतीही वाढतात आणि खर्चाचे स्वरूपही बदलते. यामुळे, केवळ आजच्या कमाईवर अवलंबून न राहता भविष्याचे नियोजन करणेही तेवढेच आवाश्यक आहे. महागाईचा तुमच्या मासिक बजेटवर कशा पद्धतीने परिणाम होतो? हे एका उदाहरणावरून स्पष्ट होते.3 / 6सामान्यतः दरवर्षी महागाईमध्ये सरासरी ६ ते ८ टक्क्यांची वाढ दिसून येते. 'सेबी इन्फ्लेशन कॅल्क्युलेटर'नुसार जर महागाई दर वार्षाला ७ टक्के धरला, तर आज एक विशिष्ट दर्जा राखण्यासाठी जो खर्च ३०००० रुपये होतो, तो १० वर्षांनंतर, तसाच दर्जा कायम ठेवण्यासाठी दरमहा ५९,०१५ रुपयांपर्यंत पोहोचेल.4 / 6अर्थात, पुढील १० वर्षांत आपल्याला दरमहा सुमारे २९,०१५ रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत. हा आकडा सध्याच्या खर्चाच्या जवळपास दुप्पट आहे. 5 / 6म्हणजेच, महागाईचा सामना करण्यासाठी केवळ काटकसरच पुरेशी नाही, तर आपल्याला आपली कमाई देखील सातत्याने वाढवावी लागेल, असेही यावरून स्पष्ट होते.6 / 6महागाई आणि उत्पन्न यांचा योग्य ताळमेळ राखल्यास आपल्या मासिक बजेटवर अधिकचा भार पडणार नाही. परिणामी अशा पद्धतीच्या आगाऊ आर्थिक नियोजनाने, भविष्यातील वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आपल्याला बळ मिळेल.