'माझ्या पत्नीला बघत बसायला मला आवडतं'; आनंद महिंद्रांचं 90 तास कामाच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 21:36 IST
1 / 7'चांगले परिणाम हवे असतील, तर आठवड्यात ९० दिवस काम करा. तुम्ही तुमच्या पत्नीला किती वेळ बघू शकता किंवा तुमची पत्नी तुम्हाला किती वेळ बघू शकते?', असे एक विधान सुब्रह्मण्यन यांनी केले.2 / 7नारायण मूर्तींच्या आठडड्यात ७० तास काम या विधानावर वादविवाद सुरू असतानाच सुब्रह्मण्यन यांच्या विधानाने त्याला फोडणी दिली. वर्क अँड लाईफ बॅलन्सचा मुद्दा चर्चेत आला. त्याबद्दल आता महिंद्रा समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही भाष्य केले.3 / 7एका कार्यक्रमात बोलताना उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणाले, 'ही चर्चा चुकीच्या दिशेने केली जात आहे. किती तास काम यावर चर्चा व्हायला नको तर गुणवत्तापूर्ण कामावर व्हायला हवी.'4 / 7'४० तास करा की ९० तास. प्रश्न असा आहे की तुम्ही काय आऊटपूट (चांगलं काम) देत आहात?', असे ते म्हणाले.5 / 7'जर तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवत नाही आहात. वाचन करत नाही किंवा विचार करण्यासाठी वेळ नाहीये. मग तुम्ही योग्य निर्णय कसे घ्याल? चांगलं आयुष्य आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आयुष्याचा समतोल राखणे खूप गरजेचं आहे. तुम्ही कायम एका बोगद्यात राहू शकत नाही', असे मत आनंद महिंद्रा यांनी मांडले.6 / 7सोशल मीडियावर सतत सक्रिय असण्याबद्दलच्या प्रश्नावर आनंद महिंद्रा म्हणाले, 'मला अधूनमधून विचारलं जातं की, मी सोशल मीडियावर किती वेळ घालवतो. मी लोकांना सांगू इच्छितो की, एक्स (पूर्वीचे ट्विटर) वा सोशल मीडियावर मी यासाठी नसतो की, मी एकटा आहे.'7 / 7सोशल मीडियावरील प्रश्नाला उत्तर देतानाच त्यांनी सुब्रह्मण्यन यांनाही अप्रत्यक्षपणे चिमटा काढला. ते म्हणाले, 'माझी पत्नी चांगली आहे. मला तिला बघत बसायलाही आवडतं. मी सोशल मीडियावर मित्र बनवण्यासाठी नाही, तर एक बिझनेस टूलचा वापर करण्यासाठी असतो', असे उत्तर आनंद महिंद्रा यांनी दिले.